जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | यावर्षी शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. परंतु अद्यापही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. ५८ हजार ४०२ असे एकूण विद्यार्थी संख्या असून या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शाळांना १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला असला तरीही हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली आहे.

कोरोनाचा संसर्ग थोडासा थांबल्यानंतर तब्बल ११ महिन्यांनी मध्यंतरी शाळा सुरू झाल्या, शिक्षणाची घडी बसत असतानाच पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यानं शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. आता शैक्षणिक वर्ष संपत आल आहे. या विद्यार्थ्यांच्या अंगावर अद्यापही चालू शैक्षणिक वषार्चा गणवेश मिळाला नाही .जिल्हापरिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत गणवेश योजना राबवली जाते पहिली ते आठवीच्या सर्व मुली आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिर्द्यरेषेखालील मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.दरवर्षी दोन गणवेशाची प्रत्येकी ३०० प्रमाणे सहाशे रुपये दिले जात होते, शाळा स्तरावरून गणवेश तयार करून दिले जातात परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे एकाच गणवेशाचा निधी देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहेत.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. शिक्षण विभागाने शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाणार असल्याचे सांगितले तसा निधीही शाळांना वितरित करण्यात आला परंतु पुन्हा कोरोनाचाचा उद्रेक सुरु झाल्याने मध्येच शाळा बंद झाल्या आणि विद्यार्थी गणवेशा पासून वंचित राहिले आहेत आता या विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळेल असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment