महापरिक्षा पोर्टल विरोधात कोल्हापूरात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज एकत्र येऊन “महापरीक्षा पोर्टल विरोधात” भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. “महापरिक्षा पोर्टल रद्द करा” अशी प्रमुख मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समिती यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित केला होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पदवी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करून शासनाच्या बेरोजगारांसाठीच्या असफल धोरणांचा यावेळी निषेध केला गेला.

महाराष्ट्र शासनाने शासकीय रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही ‘महापरिक्षा’ पोर्टल तर्फे राबविण्याचा घाट घातलेला आहे. मात्र या पोर्टल तर्फे घेण्यात आलेल्या काही परीक्षांमध्ये गेल्या काही दिवसात अनेक गंभीर गैरप्रकार आढळून आलेले आहेत. मास कॉपी, परीक्षा वेळेवर सुरू न होणे, काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडणे, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक उमेदवारास वैयक्तिक उत्तरपत्रिका न मिळणे इत्यादी मुळे विद्यार्थ्यांचा या पोर्टल वरील विश्वासच उडाला आहे. याबद्दल सरकार दरबारी यापूर्वी अनेक विनंती अर्ज दाखल केले गेले मात्र त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली.

सदर मोर्चामध्ये कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिहाधिकारी कार्यालयामध्ये मा. उपजिल्हाधिकारी यांच्याशी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा करून “महापरीक्षा पोर्टल “च्या गैरकारभाराबद्दल उपजिल्हाधिकारी यांना अवगत केले.

Leave a Comment