सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात काही महिन्यांपूर्वीच ग्रग्रसेपरेटरचे उद्घाटन झाले व तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला परंतु या ग्रेड सेपरेटर खाली काही युवक मोठ्या आवाजात हाॅर्न व स्टंट बाजी करत असल्याच पोलिसांच्या निदर्शनास आले होते वेळोवेळी सांगून सुध्दा काही दिवसापूर्वी एका युवकाने बाईक वर स्टंटबाजी करत इंस्टाग्राम वर व्हिडिओ अपलोड केला होता.
सातारा शहर वाहतूक शाखेच्यावतीने नागरिकांना आव्हान करण्यात आले होते ग्रेड सेपरेटर मध्ये किंवा अन्य कोठेही स्टंटबाजी करू नये तरीसुद्धा या युवकाने स्टंटबाजी करून चक्क व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड केला होता.
याची दखल घेऊन सातारा पोलीस अधीक्षक यांनी या युवकावर कारवाई करण्याचे आदेश दिले याच अनुषंगाने सातारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी या युवकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे अशी स्टंटबाजी करू नका नाहीतर कठोर कारवाई करण्यात येईल असेही श्री विठ्ठल शेलार यांनी आवाहन केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’