जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसणाऱ्या जत तालुक्यात बसत आहे, परंतू जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जत तालुक्याकडे पाठ फिरविली. आटपाडी आणि कवठमहांकाळ तालुक्यात जावून परिस्थितीची माहिती घेतली, त्यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पालकमंत्र्यांनी एकप्रकारे कायमस्वमी जत दुष्काळी असलेल्या जत तालुक्याकडे दुर्लक्षच त्याच्या प्रतिक्रिया या भागातीत शेतकऱ्यांतून उमटत आहेत. तसे पाहिले तर सध्यस्थितीतील दुष्काळी बनती गंभीर परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांनी दुष्काळी भागातील प्रत्येक गावात जाऊन तेथून अडचणी समजावून घेवून उपायोजना राबविण्याबाबत सूचना करण्याची गरज होती मात्र निवडणूकीत गुंग असलेल्या या राजकर्त्यांना दुष्काळाचे गांभीर्य कधी कधी येणार हा सवाल केला जात आहे. दुष्काळी भाग सरकारच्या पाठीशी राहिला आहे. असे असताना जतसारख्या भागाकडे सरकार आणि त्यांचे मंत्री दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न जनेतला पडला आहे.