मोदी सरकारचा मोठा निर्णय! खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली : यंदाच्या आर्थिक वर्षात अन्नधान्याच्या किमती वाढणार नाहीत अशी शक्यता आहे. नुकतेच नरेंद्र मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. खत अनुदानावरील चालू आर्थिक वर्षातील अनुदान वाढवण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट मध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे. यंदाच्या वर्षी खतांवरील अनुदान हे २१ हजार कोटींवरून ६० हजार कोटी इतके वाढवण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात अन्नधान्याच्या किंमती वाढण्याला ब्रेक लागणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत खतांवरील अनुदान वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी यंदाच्या खरीप हंगामासाठी खतांवरील अनुदान वाढवण्याच्या निर्णयाला कॅबिनेटने एकमताने संमती दर्शवली. खतांवरील अनुदानात तब्बल ४० हजार कोटींनी वाढ करण्यात आली असून याचा शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे.

यापूर्वी खतांवर केंद्र सरकार २१ हजार कोटी इतके अनुदान देत होते. मात्र यंदाच्या खरीप हंगामाकरिता अनुदानात वाढ करून ते तब्ब्ल ६० हजार कोटी करण्यात आले आहे. खतांवर अनुदान जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता कमी दारात खाते बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहेत. तसेच शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन यामुळे अन्नधान्याच्या किमतीतही घसरण होऊन ते स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्यांनाही फायदा होणार आहे

शेतकऱ्यांना जुन्या किंमतीत मिळणार खाते –

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जानेवारी महिन्यापासून खतांच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. रशिया युक्रेन युद्धामुळेही खतांच्या भारतातील आयातीवर परिणाम झाला आहे. आता केंद्र सरकारने आपल्या अनुदानात वाढ केल्यामुळे खतांच्या किंमती वाढणार नसून शेतकऱ्यांना जुन्या किंमतीत खाते मिळणे शक्य होणार आहे.