हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर तुम्ही,आम्ही,आपण फक्त यशस्वीतांच्या स्टोर्या,गप्पा ऐकल्या असतील.पण आजची कहाणी जरा हटके आहे.ती कहाणी आहे एका मार्गदर्शकाची किंवा आजच्या सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर मित्र, तत्वज्ञ,वाटाड्याची अर्थात ‘मितवा’ची. कहाणी आहे महादेव नरवडे नावाची गुरुजींची.दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला गुरुजींचा जन्म. खानदानी मराठा असले तरी आर्थिक परिस्थिती प्रचंड बेताचीच.अख्ख घरदार माळकरी, वारकरी.म्हणून जन्मजात अध्यात्माचे संस्कार.काहीही झालं तरी नैतिकता सोडायची नाहीं हा त्यांच्या वडिलांचा शिरस्ता.कसतरी जेमतेम शिक्षणाच्या सोयीत गुरुजींनी आपलं दहावी पर्यंतचं शिक्षण गावातच पूर्ण केलं.दहावी झालो म्हणून बारावी केली.आता शिक्षण बास झालं.पूढे पोटापाण्याचा उद्योग म्हणून त्यांनी काहीकाळ शेतीकडे लक्ष दिलं.पण सततचा दुष्काळ आणि कायमची नापीकी म्हणून तिकडं किमान जगण्याच्या अपेक्षा पूर्ण होतील याची काहीच शाश्वती नव्हती म्हणून पूर्ण नोकरी करावी या उद्देशाने मास्तर पुण्यात आले. लागलीच कुठल्या सिक्युरिटी संस्थेत अवघ्या २५०० रुपये पगाराची नौकरी धरली.बऱ्याचदा कामाचं स्वरूप रात्रपाळीत असतं म्हणून दिवसा काहीतरी करावं या उद्देशाने पर्वती पायथ्याजवळच्या शाहू कॉलेजला नावालाच फक्त म्हणून त्यांनी बीएला अँडमिशन घेतल आणि बस त्यादिवसापासून गुरुजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
बीए झालं म्हणून पुढे एमए केलं.त्याबरोबरच एमपीएससीचा अभ्यासही सूरू केला.एक – दोन अटेंप्ट दिलेत.त्यात अपयश आलं म्हणून नेट – सेटचा पर्याय त्यांनी धुंडाळून पाहिला.सेट परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश आलं. आपल्याला मिळालेल्या यशाची क्लूप्ती इतरांनाहीं सांगावी या उद्देशाने एक विध्यार्थीकेंद्री अभ्यास चळवळ उभी राहिली त्या चळवळीचेच नावं म्हणजे आपला मास्तर,सेट – नेट डिजिटल लर्निंग हब. आज याचं आपला मास्तर सेट – नेट डिजिटल लर्निंग हबने ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे.महाराष्ट्र सेट परीक्षा – २०२४ मध्ये तब्बल १०० + विध्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
या अभूतपूर्व यशाबद्दल बोलतांना प्रा. महादेव नरवडे म्हणाले की ‘माझे वडिल अशिक्षित असले तरी असंख्य अभंग त्यांना तोंडापाठ होते.म्हणून ते बऱ्याचदा संत वचन सांगत राहायचे.मला त्यातलं एक वचन कायम स्मरत राहतं ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जण! याप्रमाणे मी कायम आपलं कामं करत असतो आणि त्यातूनच हे यश मिळालं आहे असं मला वाटतं. सर्वतोपरी विध्यार्थी हिताचं कामं करणाऱ्या गुरुजींना हॅलो महाराष्ट्र कडून कडकडीत सलाम!