गणपतीपुळेतील समुद्रात बुडणार्‍या सातारमधील चार पर्यटकांना वाचविण्यात यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

सध्या गणपतीपुळे या ठिकाणी फिर्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक जात आहेत. या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी व समुद्रातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून चार पर्यटक गेले होते. समुद्रात ते गेले असता अचानक आलेल्या लाटांमुळे ते बुडाले. यावेळी त्यांना जेसकी बोट चालकांनी बुडण्यापासून वाचवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोटरेगाव तालुक्यातील नांदवडे येथील गणेश सुतार (वय 35), शमाली सूर्यवंशी (38), मृदुला सूर्यवंशी (18) व मंदी सूर्यवंशी (14) हे चौघे गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते. रविवारी देवदर्शन घेतल्यानंतर ते समुद्रात पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गेले. यावेळी या चारही जणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते अचानक बुडाले. हि गोष्ट त्या ठिकाणी असलेल्या जेसकी बोट चालकांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान राहत जेसकी बोट चालकांनी चार जणांना बुडताना वाचवले.

यावेळी गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी ही बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी जेसकी बोट चालकांना मोलाची मदत केली. या घटनेपूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी खोल समुद्राच्या पाण्यात गेलेल्या त्या चार जणांना खोलवर पाण्यात जाऊ नका, असा इशारा दिला होता.

Leave a Comment