‘कृष्णा फार्मसी’च्या विद्यार्थ्यांचे विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या फार्मसी अधिविभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध परिक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण कंपनीमध्येही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.) मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या जी-पॅट परीक्षेत महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केले. यामध्ये रेश्मा मते (९७.४२ टक्के), पार्थ जाधव (९५.९३ टक्के), निखिल मोरे (९२.२० टक्के), ओंकार धस (९१.९९ टक्के), सादिया पटेल (९२.३७ टक्के) आणि स्वालिहा पटेल (९०.९६ टक्के) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तसेच हैद्राबाद येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च’तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील पार्थ जाधव, रेश्मा मते, ओंकार धस व स्वालिहा पटेल या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या परीक्षेसाठी दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर १०,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. या दोन्ही परीक्षा पदव्युत्तर प्रवेशासाठी उपयुक्त असून, परीक्षा उत्तीर्णी झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

दरम्यान, कृष्णा विद्यापीठात बी.फार्मसीच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ‘ट्रॉयका’ या आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण कंपनीतील मार्केटिंग आणि सेल्स या पदासाठी या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये अंतिम वर्ष बी. फार्मसी मधील अक्षय कापूरकर व राहुल जाधव या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या यशाबद्दल कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, अधिष्ठाता डॉ. आर. सी. डोईजड यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment