Success Story | आजकाल शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. कधी अवकाळी पाऊस येतो, तर अचानक दुष्काळ पडतो. अशा परिस्थितीत उत्पन्न कसे घ्यावे आणि खर्च कसा भागवावा? हे शेतकऱ्यांना कळत नाही. परंतु आजकालच्या अनेक शेतकरी आहेत. जे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहे. ज्यामध्ये त्या वेगवेगळ्या आयडिया (Success Story) करून आधुनिक शेती करत आहेत. अशातच आजकाल तरुण वर्ग देखील आधुनिक शेती करत आहे. साताऱ्यातील एका तरुणाने शेतीचा एक आगळावेगळा प्रयोग केलेला आहे. आणि त्यातून त्याला खूप चांगले यश मिळालेले आहे आणि उत्पन्न देखील मिळालेले आहे.
आजकाल अनेक तरुण हे नोकरी न करता शेतीमध्ये नवनवीन व्यवसाय करायला लागलेले आहेत. आणि ते व्यवसाय त्यांचे यशस्वी देखील होत आहे. अशातच साताऱ्यातील पाडळी गावातील ऋषिकेश ठाणे या शेतकरी तरुणाने नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केलेली आहे. त्याने शेतात कोरफडची लागवड केलेली आहे. सध्या कोरफडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होत आहे. केवळ कोरफडीची शेती करूनच या शेतकर्यांनी वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल केलेली आहे. कोरफड हे खूप औषधोपचारी आहे अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे औषधांमध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो. त्यामुळे कोरफडीला देश-विदेशातून मोठी मागणी आहे.
ऋषिकेश ढाणे या शेतकऱ्याने तब्बल तीन एकराच्या शेतात कोरफडीची लागवड केली होती. त्यांनी शेताच्या बांधावर कोरफडीची लागवड केलेली होती. कोरफड तो वेगवेगळ्या कंपन्यांना पाठवत होता. त्याप्रमाणे स्वतः देखील कोरफडीपासून वेगवेगळी उत्पादन घेत होता. यातून त्याला खूप चांगला नफा झाला जिद्दी आणि चिकाटीचा वापर करून त्याने खूप चांगले आर्थिक प्रगती केलेली आहे. यात त्याच्या कुटुंबांनी देखील त्याला खूप जास्त मदत केली.
यावेळी ऋषिकेश धाणे यांनी सांगितले की, मी 2000 सालापासून शेती करत आहे. मी सुरुवातीला ज्वारी सोयाबीन मला चांगला पैसा मिळत नव्हता. परंतु पूर्ण खर्च भागत नसल्याने मी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार केला आणि कोरफड लावायचा विचार केला की रोप कोणाला तरी विकायची या उद्देशाने मी लागवड सुरू केली. किंवा तिला मला उसाच्या शेतीपेक्षा जास्त पैसे यायचे. नंतर कालांतराने कमी पैसे परंतु चांगल्या पद्धतीने कोरफडीची लागवड करायला लागलो.