Success Story | दोन भावांनी केली यशस्वी केळीची लागवड; योग्य व्यवस्थापन करून इराकला केली निर्यात

Success Story

Success Story | आजकाल अनेक तरुण हे शेती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पदार्पण करत आहेत. जर तुम्ही पिकाचे योग्य व्यवस्थापन केले आणि नियोजन केले तर तुम्हाला योग्यरीत्या शेती करता येते. आज कल शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे उत्पन्न देखील चांगले होते आणि कमी खर्चात जास्त उत्पादन शेतकरी करू लागलेले आहेत. या तंत्रज्ञानाचा आणि योग्य नियोजनाचा वापर करून अनेक शेतकरी अधिक यशस्वी होताना दिसत आहेत. आणि शेतीमधून ते लाखो रुपये कमवत आहेत.आज आपण अशाच यशस्वी भावांची कथा जाणून घेणार आहे. त्यांनी रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करून केळीचे चांगले उत्पादन घेतलेले आहे. त्यांची ही केळी इराकला देखील निर्यात करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळालेले आहे. आता आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

माढा तालुक्यातील अतुल आणि अभिजीत चव्हाण या दोन भावांनी हा प्रयोग केलेला आहे. ते दोघेही सुशिक्षित आहेत. तसेच त्यांनी शेतीत पहिल्यांदाच हा प्रयोग केलेला आहे. त्यांच्याकडे 13 एकर वडिलोपार्जित शेती आहे. या आधी त्यांच्या शेतामध्ये केवळ हंगामी स्वरूपाच्या पिकांचे उत्पादन घेतले जात होते. तसेच त्यांचा दूध व्यवसाय होता. परंतु अतुल आणि अभिजीत यांनी नोकरी न करता पुढे शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी पिकांची लागवड केली. त्यांनी बोरच्या पाण्यावर द्राक्ष बागांची लागवड केली, तसेच ट्रॅक्टर व्यवसाय देखील सुरू केला.

हळूहळू त्यांनी विहीर खोदली आणि द्राक्षांच्या बागांची शेती वाढवली. द्राक्षाचे उत्पादन घेत असताना. त्यांनी केळीच्या पिकाकडे वळण्याचा देखील निर्णय घेतला. त्यांनी तीन एकर क्षेत्रावर त्यांनी केळीची लागवड केली. त्यांनी जी 9 या जातीच्या केळीची लागवड बेड पद्धतीने केली. 2024 ला लागवड केलेल्या तीन एकर क्षेत्रामध्ये त्यांना 16 ट्रॉली शेणखत लागले. तसेच दोन पिशवी कोंबडी खत टाकून याप्रमाणे तीन एकर क्षेत्रावर 3000 केळीच्या रूपांची लागवड केली. उन्हाळ्यामध्ये पिकाला पाणी कमी पडू लागले त्यानंतर त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला.

त्यांनी रासायनिक खतांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला. जैविक खते घरच्या घरीच तयार केली. आणि पिकांना दिली चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने योग्य दहा महिन्यांमध्ये त्यांची केळी विक्रीसाठी तयार झाली. एका घडाला जवळपास 12 फण्या ठेवत, खताच्या मात्रा वेळेवर देण्यावर भर दिला. उत्तम व्यवस्थापनामुळे 30 ते 35 किलोचा एका केळीचा घड तयार केला. इराकला देखील त्यांच्या केळी निर्यात करण्यात आलेली आहे.यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळालेले आहे.