हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. जुन्या पारंपारिक पद्धतीची पिके न घेता आता नवनवीन पिकांची ते शेतामध्ये लागवड करायला लागलेले आहे. यामध्ये त्यांना चांगली यश देखील मिळत आहे. अनेक तरुण लोक देखील नोकरी सोडून शेतीकडे वळताना दिसत आहे. जर तुम्ही बाजारपेठेचा तसेच पिकांच्या भावाचा योग्य पद्धतीने अभ्यास करून नियोजन केले तर त्यातून तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकतो. शेतीमध्ये अनेक प्रकारचा भाजीपाला देखील केला जातो. परंतु जर तुम्ही योग्य नियोजन करून हा भाजीपाला केला. तर त्यातील तुम्हाला चांगला फायदा मिळेल. शेतकऱ्यांनी कोबीची लागवड करून त्यातून चांगले उत्पन्न मिळवलेले आहे. आता आपण या शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या घोडेश्वर येथे असृलम चौधरी हे राहतात. ते एक उच्चशिक्षित आहेत. त्यांनी त्यांच्या तब्बल 8 एकर क्षेत्रामध्ये कोबीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. त्यांच्या या कोबीला चांगला बाजारभाव देखील मिळालेला आहे. जर आत्ता आहे, तोच बाजार भाव पुढील दोन अडीच महिने राहिला, तर त्यांना या पिकातून जवळपास 54 लाखांची उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या शेतातून कोबीची काढणी देखील सुरू झाली आहे. तसेच त्या परिसरातील अनेक व्यापारी शेतात जाऊन त्यांच्या कोबीची खरेदी देखील करत आहे.
असलम चौधरी यांचे शिक्षण बीएससी झालेले आहेत. परंतु उच्चशिक्षण घेऊन देखील नोकरीच्या मागे न करता त्यांनी शेतामध्ये काम करण्यास सुरुवात केली. आधुनिक पद्धतीने ते शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत. तसेच शेतीकडे त्यांनी स्वतःचे करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू केले. त्यांनी कोबी सोबतच केळी, द्राक्ष इत्यादी बागायती पिके देखील घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी आठ एकर शेतीमध्ये कोबीची लागवड केली. पिकाचे योग्य व्यवस्थापन केले, योग्य पद्धतीने त्यांना पाणी दिले. आणि यातून त्यांना आता चांगले उत्पादन देखील मिळत आहे.
या शेतीतून मिळणारा कोबीचा गड्डा हा साधारणपणे दीड किलो वजनाचा आहे. त्यामुळे त्या शेतामधून त्यांना जवळपास 270 टन एवढे उत्पादन निघेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. 20 रुपये प्रति किलोचा दर त्यांनी गृहीत धरला, तर त्यांना जवळपास 54 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे 78 फूट खोलाने 30 फूट रुंद एवढी विहीर आहे. तसेच त्यांनी भीमा नदीवरून या विहिरीमध्ये पाईपलाईन देखील टाकलेली आहे. या माध्यमातून ते पाण्याचे नियोजन करतात.
या आठ एकरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जवळपास 1 लाख 78 हजार रोपांची लागवड केलेली आहे. त्यांना एक रोप 60 पैसे प्रति या दराने मिळालेले आहे. यासाठी त्यांना एक एकरी 45 हजार रुपये एवढा खर्च आलेला आहे. म्हणजेच 8 एकर साठी त्यांना एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा खर्च आलेला आहे. परंतु त्यांनी योग्य व्यवस्थापन करून कोबीची लागवड केल्याने यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा देखील होत आहे.