Success Story | बदलत्या काळासोबत आता शेतकरी देखील बदलले आहेत. त्यांची शेती करण्याची पद्धत अधिक आधुनिक होत चालली आहे. अनेक लोक आपल्या शेतीसोबत काहीतरी प्रयोग करतात. आणि तो प्रयोग त्यांचा सक्सेसफुल होता. आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची माहिती जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्याने हंगामी भाजीपाला करून तब्बल 6 लाख रुपयांची लागवड केली आहे. आणि या सगळ्यासाठी त्याला फक्त 25000 रुपयांचा खर्च आलेला आहे तर आता आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
हे शेतकरी उत्तर प्रदेशातील रायबरेली या जिल्ह्यातील शिवगड शहरातील दहीगवना या गावात राहतात. त्यांचं नाव संजय राजपूत असे आहे. त्यांनी फ्लॉवर, कोबी, टोमॅटो आणि बीटरूटची लागवड केली.
त्याचप्रमाणे संजय हे उन्हाळ्यात काकडीची लागवड देखील करतात. काकडीचा वापर कोशिंबीर आणि रायता बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे काकडीच्या शेतीतून देखील त्यांना खूप चांगला नफा मिळतो. संजय राजपूत हे एक तरुण शेतकरी आहेत .आणि ते हंगामी भाजीपाल्याचे लागवड करतात. त्यामुळे घरात बसून ते खूप चांगला नफा मिळवत असतात या भाज्यांना बाजारात चांगली मागणी असल्यामुळे त्यांना त्यांचा चांगला भाव देखील मिळतो.
संजय राजपूत यांनी सांगितल्याप्रमाणे ते गेल्या8 वर्षापासून हिरव्या भाजीपाल्यांची शेती करतात. 1 ते 2 एकर क्षेत्रावर फ्लॉवर,टोमॅटो, कोबी, बीटरूटची लागवड करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या शेतात आलेला माल ते लखनऊ येथे विकायला ने. एक एकरासाठी त्यांना 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. आणि खर्चाच्या तुलनेत त्यांना वर्षाला तब्बल5 ते 6 लाख रुपयांचा नफा मिळतो.
हंगामी भाजीपाल्यांची लागवड | Success Story
तुम्हाला जर चांगले पिक पाहिजे असेल तर त्यासाठी त्या वनस्पती आणि तिची माती देखील खूप चांगली असणे गरजेचे आह. जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे गरजेचे आहे. याशिवाय पिकांचे रोगापासून संरक्षण करावे. ही माहिती देखील संजय राजपूत यांनी दिलेली आहे. त्यांना कमी खर्चात खूप जास्त नफा झाला असला, तरी ते त्यांच्या शेतीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात. त्यांना लागणारी औषधं त्याचप्रमाणे जमिनीची देखील खूप चांगली काळजी घेतात त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चीज होते.
उन्हाळ्यात काकडीची लागवड
बागायती शेतीमध्ये ते मधमाशीपालन मशरूम उत्पादन फळे आणि फुलांची लागवड देखील होते. परंतु शेतकऱ्याला नफा मिळवायचा असतो. त्यासाठी तो वर्षभर मेहनत करतो. त्यामुळे उन्हाळ्यात खास करून संजय हे काकडीची लागवड करतात काकडीचा देखील त्यांना खूप चांगला नफा मिळतो.