Success Story | आज-काल अनेक तरुण हे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे भर देत आहेत. त्यातही अनेक लोक शेतीकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत. शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ते चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत. यामध्ये यश देखील येत आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तरुणाने भांगरतून घरी 55 फूट बूम प्रेस मशीन बनवली आहे. आणि याद्वारे त्यांनी वीस मिनिटात दहा एकर जमिनीची फवारणी केलेली आहे. त्यामुळे या युवकाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे नाव कमलेश अशोक चौधरी असे आहे. त्याचे वय 34 वर्ष एवढे आहे. आता आपण या तरुणाची यशस्वी वाटचाल जाणून घेणार आहोत.
कमलेश चौधरी हा सुरुवातीला एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. परंतु त्याचे वडील आजारी पडले आणि त्यांनी नोकरी सोडून गावाकडे यायचा निर्णय घेतला. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्या वडिलांची शेती केली. त्याच्या वडिलांची एकूण 10 एकर शेती होती. तो ती शेती करू लागला. त्याचे कृषी पदवीधर पर्यंत शिक्षण झालेली आहे. त्याने गावाबाहेर एका गोडाऊनमध्ये सर्व टाकाऊ वस्तु ठेवून त्याचा संग्रह करून ठेवलेला आहे. तो हे टाकाऊ पदार्थ वापरून दरवर्षी शेतीसाठी नवनवीन अवजार तयार करत असतो. आणि त्याचे व्हिडिओ तो युट्युबवर देखील दाखवत असतो. टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ तयार करण्याची त्याला अगदी लहानपणापासूनच आवड होती. या टाकाऊ पदार्थांचा वापर करून त्यांनी आत्तापर्यंत एक हजार आठशे पन्नास एकर वर औषध फवारणी केलेली आहे. त्याने यावर्षी हायड्रोलिक तोही 50 फूट ला तयार केलेला आहे. त्याने 50 फूट लांब इतके हायड्रोलिक बुम स्प्रे मशीन तयार केलेली आहे. यातून तो वीस ते पंचवीस मिनिटात दहा एकर शेत करा कीटकनाशके तणनाशकाची फवारणी करू शकतो.
कसे तयार केले मशीन?
हे मशीन तयार करण्यासाठी कमलेश एक जुना ट्रॅक्टर खरेदी केला. त्यांनी हा ट्रॅक्टर साडेतीन लाख रुपयांना खरेदी केला. त्यासाठी त्यांनी पंजाबीतून 1 लाख 75000 चे इजराइल बनावटीचे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले. त्यानंतर त्यांनी मागील दोन टायर सहा फूट उंचीचे तर पुढील दोन टायर साडेचार फूट उंचीचे ठेवले. त्यानंतर त्यांनी त्याला तब्बल 1000 लिटरची टाकी बसवली टाकी बसवण्यासाठी त्यांना 45 हजार रुपये एवढा खर्च आला. ही टाकी त्याने ट्रॅक्टरचा अगदी मधोमध बसवलेली आहे. त्यानंतर त्यांनी त्या टाकीत औषधे टाकून ती फवारणी करण्यासाठी एक स्पीड बसवला. जो एका मिनिटाला 185 लिटर पाण्याचा प्रेशर करतो. तसेच कीटकनाशकाची फवारणी आपल्या अंगावर येऊ नये. म्हणून त्यांनी काचेची केबिन बनवली आहे. त्यात एक पंखा देखील बसवला आहे. हे सगळे काम त्यांनी केवळ दोन महिन्यात पूर्ण केले.
कमलेशने केवळ 20 ते 25 मिनिटात दहा एकर फवारणी केलेली आहे. त्याने 50 फूट बूम स्प्रे तयार केला आहे. यामुळे खूप पटकन त्याचे काम होते. या मशीनमुळे आता मजूर वर्गाचे कष्ट कमी झालेले आहे. तसेच फवारणी करताना समप्रमाणात फवारणी केली जाते. कमी वेळात आणि पैशाची बचत होत फवारणी केली जाते. सध्या कमलेशने बनवलेली ही मशीन सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. आणि अनेक लोक त्याचे कौतुक देखील करत आहेत.