Success Story | आज-काल अनेक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. तसेच अनेक आधुनिक पिके देखील शेतातून घेत आहे. आणि त्यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत आहेत. या तंत्रज्ञानाचा तसेच नवीन आव्हानांचा सामना करत शेतकऱ्यांनी नव्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली आहे. अशातच आपण आज एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. ज्याने लसणाच्या शेतीतून लाखो रुपये गमावले आहेत.
आज काल लसणाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. जवळपास 600 रुपये प्रति किलोने लसुन विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादकांना लसणाचा मोठा फायदा होत आहेत. लसूण हा प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये भाजी करताना वापरला जातो. तसेच लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. ज्यांनी लसणाची शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
पंजाबमधील मुगा जिल्ह्यातील रोडे गावात भूपिंदर सिंग रोडे नावाचा एक शेतकरी राहतो. त्यांनी लसणाच्या बियांच्या लागवडीतून चांगला नफा कमवलेला आहे. भूपिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांच्याकडे जवळपास 20 एकर जमीन आहे. यातील त्यांनी केवळ अडीच एकरमध्ये लसूणची लागवड केलेली आहे. आणि चांगला नफा देखील कमावत आहे. तसेच उरलेल्या जमिनीत त्याने गहू, बटाटा, मोहरी तसेच अनेक प्रकारची कडधान्य यांसारखी पिके घेतलेली आहे.
सुरुवातीला अडीच लाख रुपये खर्च | Success Story
माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भूपेंद्र सिंग यांनी शेतीतील नफा आणि खर्च याबद्दल सांगितले की, त्यांना सुरवातीला भरपूर गुंतवणूक करावी लागली आहे. लसणाचे दोन प्रकार वाढतात मोठ्या लवंगा जी 386 आणि लहान लवंगा जी 323 अशा संकरित जाती आहेत. लसणाच्या बियांसाठी त्यांनी चार क्विंटल बिया लसूण पाकळीसाठी आणि प्रती एक एकर सुमारे 1.60 लाख रुपये खर्च केले आहेत.
लागवडीसाठी मजूर आणि शेत तयार करण्यासाठी त्यांना 15000 रुपये खर्च आला. तसेच खत आणि फवारणीसाठी 5 हजार रुपये खर्च आला. त्याला कापण्यासाठी 15 हजार रुपये मजूर खर्च आलेला आहे. एकूण अंदाजे खर्च काढला तर त्याला यासाठी अडीच लाख रुपयांचा खर्च आलेला आहे.
एकरी 14 लाखांहून अधिक नफा
भूपेंद्र यांनी सांगितले की त्यांना जवळपास 80 क्विंटल लसणाचे उत्पादन मिळाले. बियाणांची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी 37 ते 42 क्विंटल सुकल्यानंतर निघते. मागील हंगामात लसणाला प्रति किलो 400 ते 450 रुपये भाव होता. त्यामुळे त्यांना एक एकरला जवळपास 16 ते 18 लाखांचे उत्पादन मिळाले. तसेच सर्व खर्च जाऊन त्यांना जवळपास 14 लाख रुपयांपर्यंतचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.