Success Story | बांबूच्या शेतीतून ‘हा’ शेतकरी कमावतो लाखो रुपये; शासनाकडून मिळालेत 30 पेक्षा जास्त पुरस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story | आजकाल शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. अनेक तरुण मुले देखील नोकरी व्यवसाय करण्यापेक्षा शेतीमध्ये कष्ट करत आहेत. आणि त्यातून चांगल्या पद्धतीने पिकं घेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधून वेगवेगळे पीक घेत आहेत. आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका धुळ्यातील प्रगतशील शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्यांनी बांबूची शेती केली आणि हा शेतकरी दर वर्षाला 25 लाख रुपये कमावतो. हे शेतकऱ्याकडे 49 एकर जमीन आहे. आणि त्यातील जवळपास 25 एकर जमिनीवर त्यांनी बाबूंची शेती केलेली आहे. या बांबूच्या उत्पन्नामुळे या शेतकऱ्याला राज्य शासनासह अनेक जागतिक दर्जाचे 30 पेक्षाही जास्त पुरस्कार मिळालेले आहेत.

यशस्वी कहाणी (Success Story) महाराष्ट्रातील धुळे येथील शेतकऱ्याची आहे. या शेतकऱ्याचे नाव शिवाजी राजपूत असे आहे. शिवाजी यांनी एकूण 25 एकर जमिनीवर शाश्वत बांबूची लागवड केलेली आहे. आणि यातून ते दर वर्षाला 25 लाख रुपये एवढे उत्पन्न घेतात. शिवाजी हे देखील आधी इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपारिक शेती करत होते. परंतु अतिवृष्टी कधी कधी दुष्काळी या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या पिकांवर खूप परिणाम होऊ लागला. आणि त्या सगळ्यांना काही फायदा होत नव्हता. त्यांनी खूप जास्त भांडवल लावून देखील त्यांना काहीच फायदा न झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिवाजी राजपूत यांनी बांबूची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात जवळपास 19 विविध जातींचे बांबू लावलेले आहेत. ज्यामध्ये अगरबत्ती, कोळसा आणि बायोगॅस ऊर्जा उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूंच्या जातींचा देखील समावेश आहे. बांबूचे खोड, पान आणि पावडर पासूनही उत्पादने तयार होतात.

बांबूच्या शेतीकडे आजकाल एक प्रगतशील शेती म्हणून बघितले जाते. यासाठी सरकार देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे. शिवाजी राजपूत यांनी सांगितल्याप्रमाणे 136 जाती आहेत. त्यांनी ठिबक सिंचनासारखे आधुनिक तंत्रे वापरली आणि ही शेती केलेली आहे. या बांबूच्या वेगवेगळ्या जाती आहे. जर तुम्हाला अगरबत्तीच्या बाजारात प्रवेश करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट जातीच्या बांबूची लागवड करावी लागेल. तसेच फर्निचर आणि बायोगॅसच्या उत्पादनासाठी वेगळ्या प्रकारच्या बांबूची जात लागते. त्यामुळे आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे. यासाठी बांबूची जात काळजीपूर्वक निवडणे खूप गरजेचे आहे.

आजकाल आधुनिक शेती तंत्रज्ञानाने जे शेतकरी शेती करतात. तेच चांगल्या प्रकारे यशस्वी होतात. आणि यातील ठिबक सिंचनाचा वापर करून केलेली शेती खूप फायदेशीर ठरते. यामुळे शेती पद्धतीने त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की, या शेतीसाठी जास्त खर्च लागत नाही. त्यांनी तीन दशकांत पेक्षा जवळपास 7 लाख झाडे लावलेली आहेत. आणि 25 एकरमध्ये त्यांनी बांबूचे जंगल तयार केलेले आहे. ज्यातून त्यांना खूप चांगला फायदा होतो.