Success Story | गेल्या अनेक वर्षापासून शेती या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली आहे. अनेक सुशिक्षित तरुणांनी देखील नोकरीचा ध्यास सोडून आता शेतीची वाट धरलेली आहे. त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक लोक शेतीकडे पाहतात आणि शेती देखील एका वेगळ्या पद्धतीने केली जाते. पारंपारिक पिकांची लागवड न करता, आता शेतीमध्ये तरुण वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचे पिके घ्यायला लागलेली आहे. तसेच तंत्रज्ञानाचा आणि डिजिटलायझेशनचा वापर करून त्यांचे हे प्रयत्न यशस्वी देखील होत आहे. या यशस्वी शेतीकडे पाहून आजकाल अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. आणि अनेक करून हे शेतीकडे वळत आहेत. आज देखील आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहे. ज्याने उच्च शिक्षण घेतले, परंतु खूप चांगली शेती देखील केली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका गावातील तरुणाने 2022 मध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासूनच त्यांनी ड्रॅगन फ्रुटच्या शेती बद्दलची माहिती मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याने अनेक ठिकाणांना भेटी देखील दिली. त्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील शेतीला भेट दिली आणि त्यानंतर ड्रॅगन फ्रुटची शेती करायचे असे त्यांनी ठरवले. त्यानंतर त्याने 25 रुपये प्रतिरोप या दराने ड्रॅगन फ्रुटच्या रोपाची बुकिंग केली आणि त्याने एक एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
त्याने 10 बाय 6 या अंतरावर एक एकर क्षेत्रात ड्रॅगनदृष्टी लागवड केली. अशी लागवड करताना त्यांनी दाणेदार खतांचा वापर केला.ब2023 मध्ये ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन होणे सुरू झाले आणि पहिल्याच वर्ष त्यांनी एका एकरमध्ये 60 क्विंटल उत्पादन घेतले. बाजारात पहिल्याच वर्षी 130 रुपये किलो असा दर मिळाला. चांगला फायदा मिळाला आहे. त्याचा आत्मविश्वास देखील वाढला आणि त्यानंतर त्यांनी साडेचार एकरी क्षेत्रापैकी साडेतीन एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
यावेळी मात्र त्यांनी ही लागवड टेनिस पद्धतीने केली या पद्धतीचा वापर करून त्याने एका एकरमध्ये 4000 रोपांची लागवड केली. त्याने दहा बाय सहा या अंतरावर केली होती. तेव्हा एक एकर मध्ये त्याने 2450 ड्रॅगन फ्रुटची रोपे लावली होती. परंतु ते टेलिस पद्धतीचा वापर केल्यामुळे त्याला जास्त रोपे लावण्यात आली. आता तो या ड्रॅगन फ्रुटची यशस्वीरित्या शेती करत आहे आणि वर्षाला लाखो रुपये कमवत आहे. यावर्षी ड्रॅगन फ्रूटला 100 ते 130 रुपये किलोचा दर मिळालेला असून त्याला 170 क्विंटल फळांचे उत्पादन घेतलेले आहे. सगळा खर्च जाऊन त्याचे जवळपास 16 लाख रुपयांचे उत्पन्न झालेले आहे. त्यामुळे हा तरुण आता संपूर्ण तरुणांसाठी एक आदर्श ठरत आहे.