Monday, February 6, 2023

194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया ; महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील ही पहिलीचं शस्त्रक्रिया

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक रुग्नालयात 194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याच मत अधिष्ठता डॉ. संजय ठाकूर यांनी व्यक्त केलं.

आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी  सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र ओपीडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जुलै 2019 पासून आत्तापर्यंत 950 रुग्णांनी उपचार घेतले आहेत तर 90 ते 140 किलो वजन असलेल्या नऊ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान ही शस्त्रक्रिया करण्यात आलेला तरुण हा सोलापूरमधील एका सुखवस्तू कुटुंबातील आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर तो वडिलोपार्जित व्यवसाय संभाळतो आहे. मात्र मागील सात वर्षात त्याचे वजन तब्बल 194 किलोपर्यंत पोहचले त्यातून त्याला अनेक त्रास जाणवायला लागले. मग त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करून घेतली आणि ती यशस्वी ही झाली.

शस्त्रक्रियेपूर्वी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला डायट प्लॅन ही दिला होता. तो त्याने काटेकोरपणे पाळला आणि शस्त्रक्रियेपूर्वी दीड महिन्यात त्याने तब्बल 20 किलो वजन कमी केल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.