मलकापूर येथील कन्याशाळेत यशस्वी विद्यार्थींनी, पालकांचा सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर एसएससी परीक्षेतील, एन.एम.एम.एस व शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थींनी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमास भास्करराव मोहिते, उद्योजक दिलीप पाटील, संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, अनिल शिर्के, अरूणा कुंभार, जीवन मोहिरे, प्रकाश पाटील, प्रमिला शेलार, सविता कोळी, शितल थोरात इ.मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थिनीच्या वतीने कु. अस्मिता पाटील व कु. ऐश्वर्या आणेकर यांची भाषणे झाली. सदर कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये एस.एस.सी परीक्षेत 100 टक्के गुण मिळविलेल्या कु. ऐश्वर्या आणेकर या विद्यार्थिनीबरोबर कु. आकांक्षा चव्हाण, कु. मधुरा पाटील, कु. अस्मिता पाटील, कु. वैष्णवी जाधव, कु. उत्कर्षा काकडे, कु. करिश्मा राठोड, कु. काजल कालकर, कु. श्रेया नलवडे, कु. वैष्णवी कांबळे, कु. श्रृतिका पाटील, मृदुला शिर्के या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.

तसेच एन.एम.एम.एस2020-21 परीक्षेत जिल्ह्यात सातवी आलेल्या कु. वैष्णवी कचरे या विद्यार्थिनीबरोबर कु. समृद्धी गावडे, कु. निकीता थोरात, कु. सोनम राठोड, कु. जान्हवी पाटील, कु. वैष्णवी सूर्यवंशी, कु. सिद्दिका मुर्सल, कु. स्नेहल सूर्यवंशी, कु. शर्वरी शिंदे, कु. पायल वायदंडे, कु. मोनिका पवार व कु. प्रगती शेळके या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थींनींना रोख पारितोषिक रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षक सुरेश राजे यांनी मानले.

Leave a Comment