प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आई ने पैशे न दिल्याने युवकाने जीवन संपविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी

प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आईने पैशे न दिल्याने 18 वर्षीय मुलाने रागाच्या भरात हलफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. सय्यद फैजान एजाजुद्दीन वय 18 (रा किलेअर्क, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की,18 वर्षीय फैझान चे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते.तो नेहमी तिला महागड्या वस्तू भेट करायचा.

शुक्रवारी रात्री प्रेयसी ला भेट वस्तू घेण्यासाठी त्याने आईकडे पैशाची मागणी केली. मात्र आईने एवढे पैशे कुठे खर्च करतो अशी विचारणा करीत त्यास खडसावले व पैशे देण्यास नकार दिला. आई पैशे देत नसल्याने रागावलेल्या फैझान ने त्याच्या खोलीतील छताच्या अँगलला ओढणीच्या साहायाने गळफास घेत आत्महत्या केली.

ही घटना आज( २ मार्च) सकाळी उघडकीस आली या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास उपनिरीक्षक संजय बहुरे करीत आहेत..

Leave a Comment