सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रोप्यपदकांची कमाई सुरूच आहे. बॅडमिंटन, कुस्ती, ऍपलेटिक्स, कब्बडी, सायकलिंग आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पाचव्या दिवशी पाच सुवर्ण, सहा सेप्य आणि दोन कांस्य पदके खेळाडूंनी पटकावली. यामध्ये सातारा एक्सप्रेस म्हणून ओळख झालेल्या सुदेशना हणमंत शिवणकरने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली.
सातारा जिल्ह्यातील खरशी गावच्या सुदेशना हिने 100 मीटर धावणे स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक प्राप्त करून सातारा जिल्ह्यात गौरवास्पद अशी कामगिरी केली. तिने 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे 4 बाय 100 मीटर धावणे रिले या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी घेतला आहे.
आज होणाऱ्या स्पर्धेत हॅट्रिकची संधी
सुदेशना हिने आज होणाऱ्या 4 बाय 100 मीटर रिले व 200 मीटर धावणे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत तिने जर यश मिळवले तर तिला सुवर्ण पदकांची हॅट्रिक करण्याची संधी आहे. जागतिक ज्युनिअर एँथलेटिक्स स्पर्धेसाठी संधी सुदेशना शिवणकर हिने 100 मीटर मध्ये 11:86 सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवली आहे. भारतीय एथलेटिवस महासंघ आणि भारतीय प्रशासकीय क्रीडा विभाग तिला जागतिक ज्युनिअर एँथलेटिक्स स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी नक्की संधी देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.