महाविकास आघाडी सरकार बेवड्यांना समर्पित; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे बेवडयांना समर्पित आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याच्या निर्णयावरून निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “मस्त पियो खूप जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार पूर्णपणे बेवड्याना समर्पित आहेत. कोरोनामध्ये सर्वसामान्यांना औषधांची आवश्यकता आहे. पण हंम दवा नही, हम दारू देंगे. हम महाराष्ट्र को मध्यराष्ट्र बनायेंगे,” हे या सरकारचे निर्णय आहेत.

कष्टकरी शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. मात्र, पूर्णपणे राजकारण्यांना सहकार्य करणे आणि दारूबाजांना सहकार्य करणे हॅव या सरकारचे धोरण आहे. या सरकारने 300 टक्क्यांचा जो दारूवरचा कर होता तो 150 टक्क्यांवर नेहून ठेवला. म्हणजे वीज स्वस्त असण्याचे कारण नाही तर घरात अंधार असल्याचे चालते. पण दारी असली पाहिजे, हे या सरकारचे धोरण आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.