खटाव -माण अँग्रोच्या माध्यमातून ऊसशेती विकास कार्यक्रम राबवणार – प्रभाकर घार्गे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

उद्योग, शेती किंवा आयुष्यात अपयश आले तरी न थकता प्रयत्न करीत राहणे हे आपल्या जिवंतपणाचे लक्षण आहे. आज ऊस शेतीत अभ्यास करून संशोधन करणे व त्याचे प्रयोग करून शेती करणे काळाची गरज आहे. सध्या उसाचे पिकाची वाढती लागवड ही शेतजमिनीसाठी मारक ठरत असून सातत्याने एकच पीक घेतल्याने शेतीची सुपीकता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे खटाव -माण अँग्रोच्या माध्यमातून ऊसशेती विकास कार्यक्रम कार्यक्षेत्रात राबवणार असल्याचे मत खटाव- माण अँग्रो या साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी अंबवडे (ता. खटाव) याठिकाणी कारखान्याच्या शेती कार्यालयाचे उदघाटन व शेती तज्ज्ञाचे ऊसपीक विकास व आंतरपीक या विषयापर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, ऊस विशेषज्ञ डॉ. सुरेश पवार, माजी मृद शास्त्रज्ञ डॉ. नीलकंठ मोरे, माजी सभापती शिवाजी सर्वगोड, जिल्हा नियोजन सदस्य अशोक गोडसे, काॅंग्रेसचे नेते विवेक देशमुख, सभापती मानसिंगराव माळवे, इंदिराताई घार्गे , मा.पंचायत समिती सदस्य भरत जाधव, संचालक कु. प्रिती घार्गे, महेश घार्गे, पंचायत समिती सदस्य मोहन बुधे, रवींद्र पवार, सचिन माळी, मोहन देशमुख, नगरसेवक अभय देशमुख, सरपंच संदीप पवार, विष्णू जाधव, प्रकाश घार्गे, धनाजी पाटील, सोसायटी चेअरमन राजेंद्र जाधव, शिवाजी गोडसे, जगन्नाथ जाधव, राजेंद्र देशमुख, ईश्वर जाधव, आशाताई बरकडे, उदयसिह घाटगे, हिंदुराव पवार, महेश पवार, दत्ता पवार, मुख्य शेती अधिकारी किरण पवार, टेक्निकल संचालक नरेंद्र साळुंखे, अजित मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रभाकर घार्गे म्हणाले, सध्या ऊस लागवडीच्या अनेक जातींच्या लागवडीचे नवनवीन प्रयोग संशोधकांकडून केले जात आहेत. त्याचबरोबर उसलागवडीसोबत शेतीचा कस वाढवणारे व उसाच्या उत्पादनावर कोणताही परिणाम न होणारे पीक म्हणून सोयाबीनची आंतरपीक म्हणून लागवड केली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अधिक भर पडू शकते. खटाव तालुक्यातील उसाचे आगार असलेल्या अंबवडे गावात शेतकऱ्यांच्या मागणी वरून विभागीय कार्यालयाचे उदघाटन झाले यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याशी संपर्क सोपे होणार आहे.

यावेळी ऊस विशेषज्ञ डॉ. सुरेश पवार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानविकास झालेल्या काळात सामान्य शेतकरीही संशोधक बनू शकतो त्यासाठी नाविन्यपूर्ण शेतीचा प्रयोग व त्याचा परिपूर्ण अभ्यास आत्मसात करून घेणे आवश्यक आहे. सध्या दुष्काळी खटाव तालुक्यात शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यांच्यासाठी कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या दुरदृष्टीतून ऊसशेती सोबत आंतरपीक म्हणून सोयाबीनचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी कारखान्याच्या मार्फत गावोगावी शेती विकास कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही मांडणार आहोत. त्याचबरोबर भविष्यात कारखान्यामध्ये शेतकऱ्यासाठी हक्काचा सोयाबीन प्रोसेसिंग युनिट उभा राहिला तर उसासोबत सोयाबीन शेतीचा सक्षम पर्याय शेतकऱ्यांना मिळेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर अशोक नलवडे यांनी केले. सुत्रसंचलन व्ही. बी. खंदारे यांनी केले. आभार संचालिका कु. प्रीती घार्गे यांनी मानले.

Leave a Comment