उन्हाळ्यात उत्तम आरोग्यासाठी घ्या उसाचा रस ‘हे’ आजारही होतील बरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सध्या वातावरणात बदल होताना दिसत आहेत. त्यातच ऊन पण ही वाढायला लागलं आहे. त्यामुळे उन्हाळयात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असत. उन्हाळ्यात जर आपण उसाचा रस घेतला तर आपलं तर चांगलं रहातच मात्र त्यासोबत आपले काही आजार ही होतात. काही लोकांना गोड आवडत नसल्यामुळे ते ऊसाचा रस पित नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात. ते सांगणार आहोत.

१) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – उन्हाळ्यात शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार वारंवार होत असतात. जर तुम्ही नियमीत ऊसाच्या रसाचे सेवन केलं तर शरीरासाठी चांगलं असेल रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल.  त्यामुळे बाहेरच दुसरं काही खाण्यापेक्षा उसाचा रस प्या.

२) कॅन्सरपासून बचाव- ऊसाच्या रसात  कॅन्सर होण्यापासून रोखणारे आवश्यक घटक असतात. तसचं किडनी स्टोनच्या समस्येला सुद्धा रोखण्याची क्षमता यात असते. ऊसात एंटी कॅन्सरचे गुण असतात. कॅन्सरच्या लक्षणांना वाढण्यापासून रोखतात.

३) किडनी स्टोनपासून बचाव  ऊसाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. अनेक डॉक्टारांकडून सुद्धा उसाचा रस पिण्याचा सल्ला  दिला जातो.  ऊसाच्या रसात आम्लीय क्षमता असते. ज्यामुळे जर मुतखडा झाला असेल तर बाहेर पडण्यास मदत होते. मुत्रावाटे हा खडा बाहेर निघत असतो.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

 

Leave a Comment