हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sugarcane Juice ) बरेच लोक चहा, कॉफी, कोल्डड्रिंकऐवजी एखादं थंड पेय पिणं पसंत करतात. यामध्ये विविध फळांच्या रसाचा समावेश आहे. ज्यात उसाचा रस हे सर्वाधिक लोकप्रिय पेय मानले जाते. हे एक नैसर्गिक पेय असून ते पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण असे असूनही काही लोक उसाचा रस गरम असतो, असे म्हणून पिणे टाळतात. पण मुळात उसाचा रस एक अत्यंत लाभदायी स्पोर्ट्स ड्रिंक आहे. त्यामुळे कोणतेही कारण देऊन हे पेय टाळण्याची गरज नाही. असे असले तरीही काही बाबतीत उसाचा रस पिताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
नैसर्गिक पेय (Sugarcane Juice )
उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. त्यामुळे यातील घटक हे नैसर्गिकरित्या आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरतात. उसाच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. सुमारे १३ ग्रॅम फायबरयुक्त या रसात १८३ कॅलरीज आणि ५० ग्रॅम नैसर्गिक साखरेचा समावेश असतो. त्यामुळे काही प्रमाणात उसाचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे उसाचा रससुद्धा काही प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो.
उसाचा रस कोणी पिऊ नये?
उसाचा रस पिणे हे आरोग्यदायी असले तरी काही लोकांसाठी हे पेय पिणे धोक्याचे ठरू शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या आहारात उसाच्या रसाने सेवन घातक ठरू शकते. (Sugarcane Juice ) त्यामुळे तज्ञ सांगतात की, मधुमेहींनी उसाचा रस पिणे टाळावे. उसाच्या रसात नैसर्गिक साखर जरी असली तरीही ती मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवू शकते. ज्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहींनी उसाचा रस पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्यदायी फायद्यांसाठी ‘असा’ प्या उसाचा रस
अनेक लोकांना उसाचा रस पिण्याची योग्य पद्धत माहित नाही. त्यामुळे उसाच्या रसाचे वेळी यावेळी केले जाणारे सेवन हानिकारक सिद्ध होऊ शकते. याबाबत सांगताना काही आहार तज्ञांनी म्हटले आहे की, उसाचा रस पिण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार. त्यामुळे जर तुम्हाला उसाचा प्यायचा असेल तर तो दुपारी प्या. यामुळे काही आरोग्यवर्धक फायदे होऊ शकतात.
(Sugarcane Juice ) तसेच आणखी एक महत्वाचे म्हणजे, उसाचा रस कधीही फ्रेश तयार केलेला प्यावा. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत.
याशिवाय उसाच्या रसात नारळाचे पाणी आणि थोडा आल्याचा रस मिसळून प्यावा. यामुळे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक तयार होते. जे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते.