ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; वृद्ध ऊसतोड महिला ठार तर 4 जण जखमी

tractor carrying sugarcane was hit by a truck
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावरील कराड तालुक्यातील वराडे हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिली. या अपघातात ऊसतोड मजूर महिला ठार झाली असून 4जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. तुळसाबाई बाबासाहेब खळणावकर (रा. मोहरी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सर्वत्र ऊसतोड सुरु असल्याने ऊसतोड मंजिरी, महिला ऊस घेऊन ट्रॅक्टर, बैलगाडीतून कारखान्यात जात आहेत. रविवारी उंब्रजहून सह्याद्री सहकारी कारखान्याकडे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर निघाला होता. तो वराडे, ता. कराड गावच्या हद्दीत भराव पुलावर आला असता पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या धडकेत ट्रॅक्टर महामार्गाच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरमधील महिला तुळसाबाई हळवणकर यांना गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.