Sunday, April 2, 2023

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र। महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी असलेलं मंत्रालय अलीकडच्या काळात मात्र नागरिकांच आत्महत्या करण्याचं ठिकाण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पूर्वी अनेकदा मंत्रालयातून उडी घेत आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत.  पुन्हा असाच एक प्रकार शुक्रवारी घडला आहे. एका महिलेने मंत्रालयातून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
आपल्या कामांसाठी वारंवार हेलपाटे घालणाऱ्या या महिलेचे काम होत नसल्याने अखेर या महिलेने टोकाचेपाऊल उचलले आहे. या महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु मंत्रालयाच्या आत लावलेल्या संरक्षक जाळीमुळे या महिलेचा जीव वाचला आहे.  उल्हासनगर येथील ही महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मंत्रालयात तैनात पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतल्यानंतर या महिलेला मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून ही महिला काही कामानिमित्त मंत्रालयात गेले अनेक दिवस येरझऱ्या घालत होती. त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.