मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा सापडला मृतदेह; घातपात की आत्महत्या???

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे.  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी१०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारीला सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’