‘मम्मी-पप्पा मला माफ करा’ म्हणत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0
37
suicide of a young woman
suicide of a young woman
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील गवळीवाडा येथे एका विवाहित महिलेने नैराश्यातून आई-वडिलांच्या घरात सुसाइड नोट लिहून फाशी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रिया दिपक खेत्रे (वय 24) असे तरुणीचे माहेरकडील नाव आहे. तीन दिवसांपूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली होती आणि तीन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली.

लासूर स्टेशन ता. गंगापूर येथील दिपक खेत्रे हे हमालीचे काम करून कुंटूबाचा संसाराचा गाडा चालवतात. दिपक खेत्रे यांना पत्नीसह तीन मुली आहेत. यामधील मोठ्या मुलीने प्रेम विवाह केला होता. मात्र, पतीला सोडचिठ्ठी देवून आई वडिलांसोबत ती राहत होती. दिपक खेत्रे कुटूंबासह औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे अनेक दिवसापूर्वी राहण्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याने ती तीन दिवसापूर्वी आई-वडिलांच्या लासूर येथील घरात गेली. आणि प्रियाने फाशी घेऊन आत्महत्या केली. 1 जुलै रोजी सकाळी घरातून दुर्गंधी बाहेर येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी शिल्लेगाव पोलिसांना माहिती दिली.

याची दखल घेत शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरक्षक रविद्र खांडेकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घटनास्थळी पंचनामा केला असता, यावेळी प्रियाने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये ‘पप्पा-मम्मी मला माफ करा, मी तुम्हाला दिलेले वचन नाही निभावू शकले’ अशी नोट लिहून माफी मागत फाशी घेऊन आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here