गोवारेत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
61
Karad Police City
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तालुक्यातील कराड शहर पोलिस हद्दीत असलेल्या गोवारे गावच्या हद्दीत एका युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. गोवारे येथील जानुगडे वस्तीचे खाली नदीकडेला करंजाचे झाडाला दोरीच्या सहाय्याने एका युवकाने गळफास घेतला. सदरील घटना शुक्रवारी 17 रोजी दुपारी घडली.

याबाबतची खबर सुरेश रंगराव पवार (वय 47) रा. गोवारे ता. कराड यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. निलेश शरद पवार (वय 22) रा. वसंत विहार, कृष्णा कॅनॉल ता. कराड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

युवकांच्या आत्महत्येनंतर याबाबतची माहिती कराड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे. याप्रकरणी अधिक तपास कराड शहर पोलीस करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here