कोरोना झाल्याच्या भितीने झाडाला गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना झाला असल्याच्या भीतीने मजुराने घराशेजारील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्वेनाका (ता. कराड) परिसरात मंगळवारी दुपारी उघडकीस आली.
गोविंद राम साहू (वय 36, मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. कार्वेनाका- कराड) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचा छत्तीसगडचा असणारा गोविंद हा येथिल कार्वेनाका परिसरात असणाऱ्या एका आपर्टमेंटच्या मागे पत्र्याच्या शेडमधील खोलीत राहत होता. गोविंद मजुरीचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरातील दोघे कोरोना बाधित झाले होते. तपासणीत त्याला ही कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्याने हलगर्जीपणा करीत उपचार घेण्यास टाळाटाळ करीत पुढील उपचार भीतीमुळे घेतले नाहीत. दोन दिवसांपासून त्याला ताप ही आला होता.पण तो उपचारासाठी न जाता आपल्याला कोरोना झाला असल्याची भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व कोविड स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संबंधित मजुराचा मृतदेह ताब्यात घेत कोविड स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

You might also like