एकाच दोरीने प्रेमी युगुलाचीआत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद  | सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथील राजनंदनी कैलास दांडगे आणि शरद आस्तिक राव दांडगे यांनी शेतातील एका झाडाला एकच दोरीने गळफास घेऊन दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्रकार आज रोजी घटला आहे.

सदर घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते हे आपल्या कर्मचाऱ्या सह जाऊन मृतदेहांचा पंचनामा करून सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आजिंठा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे.

सदरील प्रेम युगुलाने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून दोघांचीही मनस्थिती चांगली नसल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी पोलीस तपास करीत असून अजिंठा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती अजिंठा पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment