या कारणामुळे सुजय विखेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर राज्यभर राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले होते. आता सुजय यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडूण यायचे असेल तर शिवसेनेच्या मदतीची गरज सुजय यांना लागणार आहे. त्यामुळेच नगरमधून विजय मिळवून राष्ट्रवादीला पर्यायाने पवार घराण्याला शह देण्यासाठी सुजय यांनी मातोश्रीची पायरी चढली असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, उत्तर नगरमधील शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचा शब्द सुजय विखे यांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचे कळते.

सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाबाबतचा व राष्ट्रीय सुरक्षेबाबतचा दृष्टीकोन पाहून आपण प्रभावित झाल्याचे सांगून कमळाचा झेंडा हातात घेतला. नगर जागेसाठी सुजय यांच्या नावाची शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पक्षप्रवेशासाठी सुजय सध्या सपत्निक मुंबईत आहेत. आज दुपारी १ च्या सुमारास सुजय मातोश्रीवर दाखल झाले व नगरमध्ये शिवसेनेने मदत करावी, अशी विनंती केली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असल्यास या गोष्टी करा, प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, वाचा काय झाली बातचीत..

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात