नाशिक प्रतिनिधी | काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील अहमदनगर च्या जागेचा तिढा न सुटल्यास राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. स्वतः विखे-पाटलांनी याबद्दल भाष्य केले आहे. हा तिढा सुटलाच नाही तर सुजय यांचा भाजप प्रवेश निश्चित होईल.
राष्ट्रवादी तीन वेळा नगर मध्ये पराभूत झाल्याने नगरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत. राष्ट्रवादीचा नगरच्या जागेसाठीचा दावा नवीन नाही, हा प्रश्न चर्चेतून सोडावावा हा विषय प्रतिष्ठेचा करू नये असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
सुजय यांची भाजप मध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरु आहे. मात्र राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार सुजायचा आहे,असे बोलून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुजयच्या पक्षांतरणाचे संकेत दिले आहेत. मात्र अजित पवार यांनी स्पष्ट केले की, अहमदनगर मधून राष्ट्रवादीचं लढणार असून ही जागा काँग्रेससाठी सोडली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?