Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेत सरकारने केले मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sukanya Samruddhi Yojana | केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने देशभरातील नागरिकांसाठी विविध योजना चालू केलेल्या आहेत. त्याचा फायदा सगळ्यांना झालेला आहे. परंतु सरकार अनेक वेळा राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना चालू करत असतात. यातीलच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. (Sukanya Samruddhi Yojana) ही योजना खास मुलींसाठी चालू केलेली आहे. भविष्यात जाऊन मुलींना त्यांचे चांगले शिक्षण घेता यावे. तसेच त्यांचे आर्थिक आयुष्य चांगले करता यावे. यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. अशातच आता या योजने संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्रालयाने या योजनेत अनेक बदल केलेले आहेत. आणि काही नवीन मार्गदर्शक तत्वे देखील जारी केलेले आहे.

केंद्रीय मंत्रालयाने जे काही नवीन नियम काढलेले आहेत. ते सर्व अल्पबचत खात्यावर लाभ होणार आहे. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ज्यांचे बँक खाते आहे. त्यांच्यासाठी देखील हे बदललेले नियम लागू होणार आहे. आता आजी आजोबांनी उघडलेले सुकन्या समृद्धी योजनेचे (Sukanya Samruddhi Yojana) खाते आई वडील किंवा कायदेशीर पालकाच्या नावे ट्रान्सफर केले जाणार आहे. त्याचप्रमाणे जर एकाच घरातील दोन सुकन्या समृद्धी योजनेच्या अकाऊंट असेल तर त्यांचे खाते बंद केले जाणार आहे. कारण जर तुम्हाला दोन मुली असेल, तर केवळ एकाच मुलीच्या नावे ही योजना तुम्ही चालू करू शकता.

पॅन आणि आधार जोडणे बंधनकारक | Sukanya Samruddhi Yojana

अर्थ मंत्रालयाने मुलीचे जे कायदेशीर आई-वडील किंवा पालक आहे. त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड या खात्याला जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अन्यथा तुमच्या हे खाते बंद होईल.

सुकन्या समृद्धी योजनेतून किती व्याज मिळते

तुम्ही तुमच्या मुलीच्या चांगल्या भवितवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तर महिन्याला 250 रुपयांपासून ते वर्षभरात 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. या योजनेअंतर्गत जमा झालेल्या पैशांवर तुम्हाला 8.2 टक्के व्याज दिले जात आहे. तसेच तुमची मुलगी 21 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेतील पैसे मॅच्युअर होतात. त्यात अकाउंट नंतर कधी मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही 50% रक्कम काढू शकता. परंतु यासाठी तुमच्या मुलीचे जन्माचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच त्या अकाउंटला आई आणि वडिलांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.