Sukanya Smiriddhi Yojana द्वारे टॅक्स वाचवण्याबरोबरच मुलीच्या भविष्यासाठी जमा करा मोठा फंड !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Smiriddhi Yojana : मुलींच्या भवितव्याची पालकांना खूप काळजी वाटत असते. त्यांच्या भविष्यासाठी विशेषत: लग्नासाठी पालकांकडून नियोजन केले जाते. आपल्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या आर्थिक भविष्याची काळजी सतावत असेल तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

Want To Open Sukanya Samriddhi Account? Here's How You Can Do It -  Goodreturns

Sukanya Smiriddhi Yojana ही खास फक्त मुलींसाठी बनवण्यात आलेली एक सरकारी योजना आहे. यामध्ये जास्त व्याजाबरोबरच टॅक्स सूट देखील मिळते. तसेच ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची देखील गरज नाही. यामध्ये अगदी 250 रुपयांमध्येही गुंतवणूक सुरू करता येईल.

How To Transfer SSY Account From One Bank To Another Bank? - Goodreturns

किती व्याज मिळेल ???

Sukanya Smiriddhi Yojana योजनेमध्ये 7.6 टक्के व्याज मिळते. यामध्ये मुलीच्या वयाच्या 10 व्या वर्षापासून खाते सुरु करता येते. तसेच मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी पैसे काढता येतील. या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे 9 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होतात. म्हणजेच जर दररोज 100 रुपये गुंतवले तर 9 वर्षांत 15 लाख रुपये मिळतील. तसेच, जर यामध्ये दररोज 416 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर 65 लाख रुपये मिळतील.

What is Sukanya Samriddhi Yojana Account: Eligibility & Benefits

खाते कसे उघडायचे ???

कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेत Sukanya Smiriddhi Yojana योजनेअंतर्गत खाते उघडता येते. Sukanya Smiriddhi Yojana योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. एकदा खाते उघडल्यानंतर, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येते. इथे हे लक्षात घ्या कि, प्रत्येक घरात फक्त 2 सुकन्या समृद्धी योजना खाती उघडता येतात. यामध्ये एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडले जाईल. मात्र जुळ्या मुली जन्माला आल्यास कुटुंबात त्यांची खाती उघडता येतील. यामध्ये जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. त्यानंतर गुंतवणूक करण्याची गरज नाही. यानंतर मॅच्युरिटीपर्यंत व्याज मिळत राहील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89

हे पण वाचा :

Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!

खळबळजनक ! आरोपी पतीने पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष, वर्धा येथील घटना

FD Rates : SBI की पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या FD वर चांगला रिटर्न मिळेल ते पहा !!!

Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 स्मॉलकॅप शेअर्सनी दिला 500 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

Silver Price : चांदीमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ???