हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सगळा राज्यकारभार पाहत असतो. जनतेला कोणत्याही गोष्टींची कमतरता आहे? राज्यामध्ये कोणत्या सोयी सुविधांची गरज आहे? या सगळ्याचा विचार करूनही राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून वेगवेगळे निर्णय घेतले जातात. परंतु अशातच आता हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सुखविंदर सिंग सुखू हे जेव्हा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी जनतेला मोठमोठे आश्वासन दिलेली होती. परंतु सध्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आणि त्यांनी चुकीचा कारभार देखील सांभाळला आहे. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. एकेकाळी सुखविंदर सिंग हे राज्याला समृद्धीकडे नेणारे एक सक्षम असे नेते होते. परंतु त्यांनी यावेळी त्यांचा कार्यभार चांगल्या पद्धतीने सांभाळला नाही. तसेच जनतेला दिलेले वचन देखील पाळले नाही. यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसत आहे.
आश्वासनांची पूर्तता नाही
ज्यावेळी सुखविंदर सिंग सुखू हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पदभार स्वीकारताना त्यांनी सांगितले होते की, ते सगळ्या पायाभूत सुविधांचा सुधारणा करतील. बेरोजगारी दूर करतील आणि हिमाचल प्रदेशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सगळे प्रयत्न करतील. या प्रकारचे अनेक आश्वासने त्यांनी जनतेला दिली होती. परंतु अजूनही त्यांनी त्यांचे एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. याचे उदाहरण म्हणजे राज्याच्या बेरोजगार भत्ता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांना मोठे अपयश आलेले आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी एक कोणतीही योजना पूर्णपणे मार्गाने लावली नाही. त्याचप्रमाणे राज्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये रस्ते नीट झालेले नाही. पर्यटन क्षेत्राला देखील चालना दिलेली नाही. या सगळ्या बाबत आश्वासन त्यांनी दिलेले होते. परंतु त्यांनी त्यांच्या एकाही वचनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज आहे.
चुकीच्या कारभाराची यादी
सुखविंदर सिंग सुखू हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने राज्यकारभार सांभाळत आहेत .राज्यांमध्ये लोकांना आरोग्य सेवा तसेच शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवा देखील नीट पोहोचत नाही. यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. सरकारी शाळांमध्ये शिक्षण तसेच संसाधनांची कमतरता देखील आहे. यंत्रणेमध्ये एक मोठ्या प्रमाणात गडबड झालेली दिसत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या प्रशासनाच्या अभावाबद्दल टीका केली गेली आहे. आणि ही सगळी संकटे वेगळीच रोखण्यासाठी त्यांच्याकडे एका आशेने देखील बघितले जात आहे.
विधानसभेच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांची डुलकी
विधानसभेची एक महत्त्वपूर्ण चर्चा चालू होती. आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री सुखू हे झोप घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात संताप देखील व्यक्त केला होता. जेव्हा राज्य सरकार कर्मचाऱ्यांचे पगार रखडणे, शिक्षक आरोग्य सेवा कर्मचारी इत्यादीबद्दल चर्चा करत नाही. त्यावेळी लोकांमुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील घेत आहे. त्यामुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी झालेला दिसत आहे.
राज्यात वाढतोय ड्रग्सचा धोका
हिमाचल प्रदेशात सध्या ट्रकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी देखील सुखविंदर सिंग सुख यांचे या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही. आम्ल पदार्थाच्या गंभीर समस्याने हे संपूर्ण राज्य ग्रासलेले आहे. राज्यातील तरुणांमध्ये कुलू, मनाली, मंडी यांसारख्या भागात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि गुन्हेगारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या सगळ्याचा प्रभाव तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आणत आहे.