उन्हाळ्यात Healthy राहायचंय? डायटमध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । थंडीचे दिवस संपले अन आता गरमीचे दिवस सुरू झाले आहेत. कडक उन्हाळा देखील आता आपल्याला जाणवायला लागला आहे. उन्हाळा येताच आपली शरीराची आवश्यकताही बदलते म्हणजेच शरीराला योग्य प्रमाणात पाणी, ताजे फळे आणि पोषण तत्वांची आवश्यकता असते. उन्हाळ्यात, विशेषतः जास्त तापमानामुळे शरीराला घाम जास्त येतो आणि शरीरातील पाणी कमी होतं तर या गोष्टी नॉर्मल आहेत. त्यामुळे आपण आपल्या आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश करतोय यावर देखील खूप गोष्टी निर्भर असतात. उन्हाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्याची झळ कमी करण्यासाठी खालील पद्धतीने आहार ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेवूयात उन्हाळ्यात आपल्या डायटमध्ये कोणते पदार्थ असणे आवश्यक आहे.

आता तर होळी सण देखील आला आहे आणि एकदाचा हा सण झाला की अजून जास्त तापमानात वाढ होताना आपल्याला दिसेल आणि अशा या कडक उन्हाचा सामना करायचा असेल तर खालील पद्धतीने तुम्हांला शरीराची काळजी घ्यावी लागेल.

पाणी आणि फ्लुईड्स –

जेव्हा बाहेरील तापमानात वाढ होते तेव्हा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण हे कमी व्हायला लागते. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यात पाणी जास्त नाही प्यायलात तर वाढत्या तापमानात शरीर हायड्रेट राहणार नाही. याचाच परिणाम उन्हाचा भयानक त्रास तुम्हांला सहन करावा लागेल. यासाठी दिवसभरात तुम्ही किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेच आहे. त्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी, आणि ताज्या फळांचे ज्यूस देखील प्यायला हवे , यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होईल.

डायटमध्ये करा या गोष्टींचा समावेश –

उन्हाळ्यात जास्त चांगली निवडक फळे मिळतात. खरबूज, पपई, सफरचंद, आंबा आणि लिंबू ह्या फळांमध्ये पाणी आणि फायबर्स भरपूर असतात. या फळांचा डायटमध्ये समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि हि फळे खाल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. भाज्या आणि सैलड्स हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत त्यामध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, आणि शाकाहारी पद्धतीने तयार केलेल सैलड् उन्हाळ्यात ताजेपणा आणि पोषण दोन्ही देतात.

यासोबतच दही आणि ताक शरीरातील पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. दही मध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचन आणि हाडांसाठी उपयुक्त असतात. उन्हाळ्यात हलकं आणि चवदार असलेलं ताक हे शरीरात उष्णता कमी करण्यात मदत करते.

अक्रोड आणि ओट्स हे हाय फाइबर आणि हाय प्रोटीन असलेले ड्रायफ्रुट्स आहे, हे उन्हाळ्यात सकाळी उठल्या उठल्या खाल्लं तर उत्तमच. यासोबतच नट्स आणि बीज, लिंबू आणि हळद यांचा देखील समावेश रोजच्या आहारात ठेवायला हवा. लिंबू मध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करतं.

उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात –

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे, हलके आणि पोषक अन्न खाणे, आणि शरीराला उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात. उन्हाळ्यात जास्त तिखट आणि तेलकट पदार्थां खावू नयेत. यामुळे पोटात जळजळ, ऍसिडिटीचे प्रमाण वाढते त्यामुळे हे पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यात उष्णतेमुळे हॉट ड्रिंक्स, जसे की चहा, कॉफी इत्यादींचा अधिक वापर केल्यास शरीराच तापमान वाढू शकते. तसेच तुम्ही जेव्हा उन्हातून चालत जाता आणि घरी गेल्यावर लगेच पाणी पिता तर ही चूक देखील करू नका. उन्हातून आल्यावर 5 मिनिट तरी पाणी किंवा इतर थंड पेय घेवू नका.