Summer Drinks : उष्माघातापासून बचाव करतील ‘ही’ 5 पेय; गरमीचा त्रास बिलकुल होणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Drinks) गेल्या काही दिवसात ऊन इतकं वाढलंय की, सूर्य कोणत्या जन्माचा राग काढतोय तेच समजेना. उन्हाचे चटके इतके बेकार आहेत की, बस रे बस. अलीकडेच अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. दरम्यान, उष्माघाताने त्रासलेली अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत. अशा गरमीच्या दिवसांमध्ये थंड पेय प्यावी असे सगळ्यांनाच वाटते. पण, अशा दिवसात नुसती थंड नव्हे तर शरीराला आतून थंड करतील अशी पेय पिणे गरजेचे असते. ज्यामुळे गरमीचा त्रास होत नाही. चला तर अशा काही आयुर्वेदिक पेयांविषयी जाणून घेऊया.

कोरफडीचा रस (Summer Drinks)

कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. जिचा अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदा आहे. सुदृढ आणि निरोगी आरोग्य देणाऱ्या कोरफडीचा रस उन्हाळ्याच्या दिवसात पिणे अत्यंत लाभकारी ठरतो. कारण यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स तसेच अँटीऑक्सिडंट्स शरीराला आतून थंड करून पचनसंस्था सुधारतात. यामुळे पोटाच्या समस्या देखील होत नाहीत. शिवाय रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते.

आवळ्याचा रस

आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी वरदान समजले जाते. (Summer Drinks) कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर पोषक तत्वे असतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवून संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. शिवाय यातील दाहक विरोधी गुणधर्म आणि फायबर पचनसंस्था निरोगी राखतात.

बेलचा रस

बेल फळाचा रस चवीला खूप चांगला आणि आरोग्यासाठी अमृत मानला जातो. (Summer Drinks) याचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि यातील पाचक एन्झाईम्स व फायबर पचनसंस्था निरोगी ठेवतात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या जाणवत नाहीत. शिवाय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य देखील सुधारते.

कारलं आणि जांभळाचा रस

गरमीच्या दिवसात उष्णेतेपासून वाचायचे असेल तर कारले आणि जांभूळ मिश्रित रस जरूर प्या. या रसामुळे ग्लुकोजची पातळी स्थिर राहते. शिवाय स्वादुपिंड निरोगी राहते आणि इतकेच नव्हे तर या रसामुळे उच्च रक्तदाब, अपचन आणि यकृताच्या समस्याही दूर होतात.

नोनी रस

नोनी फळातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाच्या रसाचे सेवन अवश्य करा. (Summer Drinks) याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील कमी होते आणि पचनसंस्थासुद्धा सुधारते.