हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Foods) कडाक्याच्या उन्हाळ्यात अंगाची नुसती लाही लाही होते. घामोळं, घामटलेल्या अंगाचा वास आणि उष्णतेच्या वाढीमुळे होणारे इतर त्रास अक्षरशः जीव काढतात. शिवाय सन स्ट्रोक, उष्माघात, डिहायड्रेशन या समस्या वेगळ्याच. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. नुसते २४ तास पंखे, एसी वापरल्याने आराम मिळणार नाही. तर आपल्या शरीराला आतून कुल ठेवण्याची गरज असते. यासाठी आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
आहाराकडे लक्ष द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडणे फार साहजिक आहे. तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात तळलेले पदार्थ तसेच तिखट आणि आंबवलेले पदार्थ खाणे टाळायला हवे. कितीही आवडीचे असले तरीही असे पदार्थ आहारात नसतील याची काळजी घ्या. आता तुम्ही म्हणाल मग खायचं तरी काय? (Summer Foods) तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. आपल्या आहारात कोणते पदार्थ असावे? ज्यामुळे शरीर थंड राहील आणि हायड्रेटेडसुद्धा. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
शहाळ्याचे पाणी
हिरवा नारळ म्हणजेच शहाळं प्रत्येक हंगामात आपल्या शरीरासाठी फायदेशीर लाभ देऊ शकत. शहाळ्याच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे अत्यंत पोषक आणि आरोग्यदायी घटक असतात. (Summer Foods) जे आपलं शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आणि इतर समस्यांपासून बचावासाठी शहाळ्याचे पाणी दररोज प्यायला हवे.
दही आणि ताक (Summer Foods)
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या आहारात दही आणि ताकाचा समावेश असणे फार गरजेचे असते. कारण, या पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचा समावेश असतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. इतकेच नव्हे तर यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. ताक पितेवेळी काळे मीठ आणि पुदिन्याची ताजी पाने चुरून मिसळून प्या. यामुळे तुमचे पोट थंड राहील आणि पचनक्रिया सुरळीत राहील.
काकडी, कलिंगडाचा ज्यूस
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या आहारात काही फळांचा समावेश फार फायदेशीर ठरतो. यामध्ये कलिंगड आणि काकडीचा समावेश आहे. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. (Summer Foods) त्यामुळे अशा फळांचे सेवन केल्याने आपले शरीर दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. तसेच यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी चांगले असतात.
कच्चा आवळा
आवळा हा अत्यंत गुणकारी असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कच्चा आवळा खाणे उन्हाळ्याच्या दिवसात विशेष फायदेशीर ठरते. (Summer Foods) उन्हाळ्याच्या हंगामात कच्च्या आवळ्याच्या फोडी किंवा त्याचा रस तुम्ही आहारात घेऊ शकता. यासोबत मध आणि बर्फ घेतल्यास चवीत आणखी भर पडते.