हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places To Visit) उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घामाच्या धारा आणि शरीराची लाही लाही होणं आलंच. वाढत्या तापमानामुळे शरीराचं तापमान वाढत. मग चिडचिड होणं आलंच. अशावेळी कुठे बाहेर पडायचं पण नको वाटत. पण मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या वाया जाऊ नये म्हणून छोट्या पिकनिकचा तरी प्लॅन करावा लागतो. अशावेळी कुटुंबासोबत शांत वेळ घालवण्यासाठी आणि त्यासोबत उन्हाळ्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाण सांगत आहोत. महाराष्ट्राबाहेर किंवा अगदी देशाबाहेर जायची गरज नाही. चला तर तुमच्या खिशाला परवडतील आणि मनाला आवडतील अशी कमाल ठिकाण जाणून घेऊया.
आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रातील महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा, माथेरान या ठिकाणी १००% फिरायला गेले असाल. पण आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याचा विसर पडेल अशा ठिकाणांची माहिती देत आहोत. जिथे एकदा जाल तर परत परत जायची इच्छा होईल.
1. रत्नागिरी (Summer Places To Visit)
उन्हाळ्याच्या दिवसात रत्नागिरी जिल्हा फिरायला जरूर जा. कारण, छत्रपती शिवाजी महाराज रत्नागिरीचे शासक होते आणि त्यामुळे येथील मंदिरे, गडकिल्ले, समुद्र, बीच पाहण्यासारखे आहेत. भाट्ये बीच, मांडवी बीच, गणेशगुले बीच, गणपतीपुळे बीच, मालगुंड, गुहागर बीच पाहण्यासारखे नव्हे तर अनुभवण्यासारखे आहेत. गणपतीपुळे मंदिर, परशुराम मंदिर, बामणघळ, वेळणेश्वर शिवमंदिर, जयगड किल्ला, रत्नदुर्ग किल्ला देखील एक्स्प्लोर करण्यासारखे आहेत. शिवाय सागरी मत्स्यालय, संग्रहालय, थिबा पॅलेस, टिळक अली संग्रहालय देखील पाहण्यासारखे आहे.
2. मालवण
उन्हाळ्यात मालवण फिरायची मजा काही वेगळीच आहे. इथला निसर्ग, नारळाची झाडं, समुद्र, मासेमारी बंदर, सनसेट्स, पाणथळ पाहण्यात एक वेगळंच सुख आहे. शिवाय इथले तारकर्ली बीच, मालवण बीच, चिवला बीच, देवबाग बीच, भोगवे बीच, निवती बीच निसर्गरम्य दृश्य आणि मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय येथील छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्ग किल्ला एकदा तरी जरूर एक्स्प्लोर करा. (Summer Places To Visit) याशिवाय रॉक गार्डन, गोल्डन रॉक, डॉल्फिन पॉईंट, जय गणेश मंदिर, त्सुनामी आयर्लंड ही ठिकाणे देखील पाहण्यासारखी आहेत. इथे पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, जेट स्की राईड, बंपर बोट राईड, स्कुबा डायविंग सारखे वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला पाण्यातून बाहेर येऊच देणार नाहीत, इतके मजेशीर आहेत.
3. काशीद
उन्हाळ्यात आल्हाददायी वातावरणात फिरायला कुणाला नाही आवडणार? त्यामुळे सुंदर खळखळणाऱ्या लाटांचा समुद्रकिनारा, हवीहवीशी शांतता आणि नयनरम्य सूर्यास्ताच्या दृश्यांसह महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेल्या काशीद बीचला फिरायला जा. इथला निसर्ग तुम्हाला जवळपास प्रेमात पाडेल. (Summer Places To Visit) निळा समुद्र, पांढरी वाळू, जंगल सफर आणि सीफूड प्रेमींसाठी हे एक कमालीची ठिकाण आहे. इथे समुद्रकिनाऱ्यासोबत मुरुड जंजिरा किल्ला, कोरलाई किल्ला पाहण्यासारखा आहे. शिवाय स्कुबा डायविंग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग, केळीच्या बोटी अशा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत.
4. अलिबाग
मुंबईपासून जवळ आणि रायगड जिल्ह्यात वसलेले अलिबाग हे एक असे पर्यटन स्थळ आहे जे प्रत्येक मौसमात फिरायची एक वेगळीच मजा देत. (Summer Places To Visit) महाराष्ट्रातील ‘मिनी गोवा’ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तिन्ही बाजुंनी अरबी समुद्र, स्वच्छ किनारे, चविष्ट सी फूड यांसह येथील किल्ले पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. इथे राहायला स्वस्त असे रिसॉर्ट, हॉटेल्स आणि निवासी व्यवस्था उपलब्ध आहे. शिवाय फिरण्यासोबतच इथे पॅरासेलिंग,जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, बम्पी सवारी, कॅम्पिंग, सगर्गद ट्रेकिंग अशा विविध गोष्टी करू शकता.
5. आंबोली
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असल्याने येथील हवामान मनाला आणि शरीराला विशेष थंडावा देते. पावसाळ्यात तर या ठिकाणी तुडुंब गर्दी असते. पण उन्हाळ्यात आवर्जून भेट देता येईल असे हे ठिकाण आहे. कारण येथील हवामान कायम थंड असते. येथे माधवगड किल्ला, नंगता पॉईंट, सनसेट पॉईंट, शिरगावकर पॉईंट, आंबोली फॉल्स अशी बरीच मस्त ठिकाण एक्स्प्लोर करता येतात. शिवाय निसर्ग प्रेमी आणि जंगल ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे. (Summer Places To Visit) आंबोलीतील कावळेशेत पॉईंट तर आवर्जून पाहावा असा आहे. कारण इथे दरीत एखादी वस्तू फेकली की हवेच्या दाबाने ती उलट दिशेने परत बाहेर फेकली जाते.