Summer Special : उन्हाळी स्पेशल!! नूडल्सपेक्षाही भारी चवीच्या कुरडई बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Summer Special
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Special) उन्हाळा सुरु झाला की, महाराष्ट्रात वाळवण घालण्याची फार जुनी परंपरा आहे. आता वाळवण म्हणजे काय? तर घरोघरी महिला संपूर्ण वर्षभर पुरतील असे पापड, शेवया, नळ्या आणि कुरडई बनवतात. महाराष्ट्रात अनेक गावागावात बायका एकत्र येऊन पापड – कुरडई बनवण्याचा घाट घालतात. कुरडई हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतील एक पारंपरिक पदार्थ आहे. जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी चवीचवीने खातात. काही लोक गव्हाच्या तर काही लोक तांदळाच्या कुरडई बनवतात. सध्या सोशल मीडियावर कुरडई बनवणाऱ्या काही महिलांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हालाही गावाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडीओ (Summer Special)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, काही महिला एकत्र येऊन अत्यंत पारंपरिक स्वरूपाच्या गव्हाच्या कुरडई बनवत आहेत. यासाठी त्या गरम पाण्यामध्ये गव्हाचा चीक टाकताना दिसत आहे. चिकाच्या गाठी होऊ नये म्हणून महिलांसह काही पुरुष मंडळीदेखिलक त्यांना मदत करताना दिसत आहेत. हा चीक चांगला परतून घेतला जातोय.



तो शिजल्यानंतर महिला सोऱ्यामध्ये छोटे छोटे गोळे भरून त्याच्या कुरडई तयार करताना दिसत आहेत. ताटाला तेलाचा हात लावून त्यावर या कुरडई काढल्या जात आहेत. (Summer Special)त्यानंतर ताट पलटी करून प्लॅस्टिकच्या पेपरवर कुरडई उन्हामध्ये वाळवल्या जात आहेत. या व्हिडिओत गावाकडे कुरडई कशी बनते ते दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांना गावाची आठवण आली असेलच.

ही आहे आपली संस्कृती..

हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर f4foodi नावाच्या हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘महाराष्ट्रीयन स्पेशल कुरडई’. (Summer Special) या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यांपैकी एका युजरने लिहिले आहे की, ‘ही आहे आपली संस्कृती’.

तर आणखी एकाने लिहिलंय, ‘माझ्या घरी आजही मावशी, मामी, आई, आजी, ताई अगदी सर्वच नातेवाईक पुष्कळ प्रमाणात गव्हाच्या कुरडई, पापड, गव्हाच्या शैवया, साबुदाणे पापड, साबुदाणे चकली, वेफर्स, लाल तिखट मसाला (चटणी) वर्षभर पुरेल इतकी स्टील टाक्या भरून बनवतात. खूप खूप मेहनत लागते ते सर्व बनवण्यासाठी महिनाभर सर्व दमून जातात, नंतर संपूर्ण घर स्वच्छ करून ठेवतात. व्हिडीओ पाहून, मला माझं संपूर्ण लहानपण आठवलं’. (Summer Special) तर अन्य एका युजरने लिहिलंय, ‘ही शेवटची पिढी आहे की ते त्यांना जमत ह्या गोष्टी करायला कुरडी पापड …नवीन जनरेशनला नाही होणार ह्या गोष्टी…सलाम माउलींना!!’.