सनी लिओनीने घेतला कठोर निर्णय; ‘या’ भयानक आजाराच्या भीतीनं चाहत्यांना ‘सेल्फी’ देणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक चित्रपटांमध्ये अभिनय आणि डांन्स नंबर केल्यावर सनी लिओनी आता निर्माता बनली आहे. सध्या सनी आपला पती डॅनियल वेबरसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या एका शूटच्या संदर्भात सनी देशाबाहेर गेली होती. यावेळी तिची टीमही तिच्यासोबत दिसली. सनी बऱ्याच वेळेस आपल्या टीममधील प्रत्येकासोबत तसेच आपल्या चाहत्यांना भेटते. सनीने कधीही आपल्या चाहत्यांना तिच्यासोबत सेल्फी घेण्यास मनाई केली नाही.परंतु, आता एका भयानक आजारामुळे सनी लिओनने चाहत्यांना सेल्फी देण्यास नकार दिला आहे. या आजाराचे नाव कोरोना व्हायरस आहे.

बुधवारी सनी लिओनी, आपला पती डॅनियल आणि टीमसमवेत विमानतळावर हजर झाली. इथे सनीने आपल्या हातात एक मास्क असल्याचे दिसले. दरम्यान, काही चाहते तिच्याबरोबर सेल्फी घेण्याविषयी विचारणा करत असताना सनीच्या टीमने त्यांना मनाई केली. परंतु, तितक्यातच एक मुलगी तिच्या फोनसह सनीकडे आली. या मुलीने सनीला मास्क काढायला सांगितलं, मात्र सनी आपला मास्क घालत तिथून निघून गेली.

पाहुयात या संदर्भातील व्हिडिओ-


View this post on Instagram

#CoronaVirusAlert No Selfie Pls #SunnyLeone at the airport today #instalove #staysafe #wednesday #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on Jan 28, 2020 at 11:30pm PST

सनी लिओनीने ट्विटरवर आपला पती डॅनियलबरोबर एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तोंडावर मास्क घातलेला दिसत आहे. या फोटोसह तिने लिहिले की, ‘सुरक्षित रहाणे हा नवीन ट्रेंड आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबतीत बेभान होऊ नका किंवा कोरोना विषाणूचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. असा विचार करू नका. हुशार व्हा आणि सुरक्षित रहा.

 

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच; सर्वाधिक सामने खेळण्याचा मान, विजय मात्र एकचं

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा : युवा खेळाडू डोमिनिक थेईमकडून अनुभवी राफेल नदालचा पराभव, नदाल स्पर्धेतून बाहेर

जिओचे सिम कार्ड पोर्ट करा आणि चिकन मोफत मिळवा; दुकानदाराची अनोखी शक्कल

Leave a Comment