साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना गुंड म्हणणाऱ्या उद्योजकाला समर्थकांकडून चोप, कपडे फाडून फासले काळे

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कोणी काही बोलल्यास सातारा जिल्ह्यातील समर्थकांकडून त्याची चांगलीच दखल घेतली जाते याचा प्रत्यय अनेकवेळा आलेला आहे. नुकतीच अशी घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे घडली. या ठिकाणी एका उद्योजकाने खासदार उदयनराजे भोसले यांचा गुंड असा उल्लेख केला. यावर आक्रमक झालेल्या खासदार समर्थकांनी त्या उद्योजकाला चांगलाच चोप दिला. तर त्याचे कपडे फाडून त्याच्या तोंडाला काळेही फासले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, इंदापूर येथील एमआयडीसी कंपनीचा मालक असलेल्या अशोक जिंदाल या नावाच्या उद्योजकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो खासदार उदयनराजे भोसले यांचा उल्लेख गुंड असा करताना दिसून येत आहे. त्याच्या व्हीडीवरून शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. त्यांनी त्या उद्योजकाचा शोध घेतला असता तो इंदापूर येथील निघाला. त्या कार्यकर्त्यांनी टीका करणाऱ्या उद्योजकाच्या तोंडाला काळे फासले, त्याचे कपडे फाडले तसेच त्याची धिंडही काढली. धिंड काढल्यानंतर त्या उद्योजकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी पोलिसांनी उद्योजकांवर गुन्हा दाखल केला आहे. इंदापूर येथील घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर समर्थकाने ज्या प्रकारचे धाडस केले आहे. त्याप्रमाणे कोणीही असा प्रकारचे धाडस करू नये, म्हणून त्या उद्योजकाला पोलिसांनी कडक शिक्षा करावी, अशीमागणी केली आहे.