औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवारांच्या बैठकीत तुफान ‘राडा’, कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या औरंगाबादमधील बैठकीत जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विजय वडेट्टीवार यांची औरंगाबादमध्ये बैठक सुरु असतानाच काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी समाजासाठी काय केलं असा प्रश्न उपस्थित करताच नेत्यांच्या समर्थकांनी आक्रमक रुप घेतलं. यातूनच झालेल्या वादाचं रुपांतर धक्काबुक्की आणि बाचाबाचीतही झालं (Quarrel in meeting of Minister Vijay Wadettiwar on OBC reservation issue in Aurangabad).

विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत गोंधळ झाल्यानं याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच ओबीसी नेत्यांमध्येच गट पडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या या बैठकांमधील हे वाद थांबणार की असेच सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment