supreme court : मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही ; सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी

0
1
supreem court
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

supreme court : भारतीय दंड संहितेत निक्रोफिलिया म्हणजे मृत देहांसोबत लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जात नाही असे स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने दिले आहे. कर्नाटकातील एका केसमधील प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे (supreme court) न्यायाधीश सुधांश धुलिया आणि न्यायमूर्ती असामुद्दीन अमान उल्लाह यांच्या खंडपीठाने कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी करत असताना हा निर्णय दिला आहे.

या प्रकरणी कर्नाटक सरकारकडून अतिरिक्त वकील अमन पवार यांनी युक्तिवाद केला की, आयपीसी कलम 375 सी मध्ये शरीर या व्याख्येत मृत शरीरही मानलं जायला हवं. बलात्काराच्या तरतुदीत जर एखाद्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार मानले जाते त्याच आधारे मृत शरीरही सहमती देऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याशी ही लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार मानले जावे अशी मागणी केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने (supreme court) हा युक्तिवाद मान्य केला नाही. नेक्रोफिलिया भारतीय दंड संहितेत गुन्हा मानला जात नाही. त्यामुळे. कर्नाटक हायकोर्टांना त्यांच्या आदेशात स्पष्ट केलं की मृत शरीरासोबत लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार मानला जाऊ शकत नाही. कारण आयपीसी कलम 375 आणि 377 केवळ जिवंत मनुष्यावरच लागू होतो. कलम 375 आणि 377 चा बारकाईन अभ्यास केला तर मृत शरीराला व्यक्ती अथवा मानव समजलं जाऊ शकणार नाही त्यामुळे या कलमात गुन्हा नाही म्हणून आरोपीवर ३७७ अंतर्गत शिक्षा होत नाही.

नेक्रोफिलिया ही गंभीर समस्या आहे. संसदेत त्याला गुन्हा घोषित करण्यासाठी कायदा बनवायला हवा असेही कोर्टांने यावेळी सांगितलं. याआधी छत्तीसगड हायकोर्टाने ही मृत महिला अथवा मुली सोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही. त्यामुळे एका प्रकरणात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता.

काय आहे प्रकरण ? (supreme court)

हत्यानंतर मृतदेहाची लैंगिक संबंध ठेवण्याच्या एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय. हायकोर्टाने या खटल्यामध्ये बलात्काराच्या आरोपातून गुन्हेगाराला सोडून दिलं होतं. परंतु हत्येच्या आरोपात त्याचे शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या खटल्यात महत्त्वाचे टिप्पणी केली असून भारतीय दंड संहितेत नेक्रोफिलिया म्हणजेच मृतदेहा सोबत लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जात नाही असं कोर्टाने म्हटल आहे.

कायदा बनण्याची गरज (supreme court)

दरम्यान हॉस्पिटल आणि शवागृहात मृत युवतींसोबत सोबत लैंगिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना (supreme court) समोर आल्या होत्या. परंतु भारतात या प्रकरणी विशेष कायदा नाही नेक्रोफिलिया हा एक मानसिक लैंगिक विकार आहे. केंद्र सरकारने मृत व्यक्ती विशेषतः महिलांची प्रतिमा जपण्यासाठी आयपीसी 377 कायद्यात दुरुस्ती करून नेक्रोफिलिया गुन्हा ठरवायला हवा. युनायटेड किंगडम, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेत हा गुन्हा आहे. त्याचप्रमाणे भारतातही असा कायदा व्हायला हवा अशी मागणी आता केली जात आहे.