Supreme Court On Ind VS Pak Match : भारत- पाक सामना रद्द होणार?? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

Supreme Court On Ind VS Pak Match
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Supreme Court On Ind VS Pak Match । आशिया चषक २०२५ मध्ये रविवारी म्हणजेच १४ सप्टेंबरलला भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगतदार सामना होणार आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याविषयी मोठी उत्सुकता आहे, तर दुसरीकडे देशवासीयांच्या अशाही भावना आहेत कि ज्याप्रकारे पाकिस्तानने पहलगाम हल्ला करून निष्पाप भारतीयांचे जीव घेतले, त्यांच्या पत्नीचे सिंदूर पुसले ते पाहता कोणत्याही परीस्थितीत पाकिस्तान विरुद्ध खेळायलाच नको. याच संदर्भात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र कोर्टाने अवघ्या ३ शब्दात उत्तर देऊन हा विषयच संपवून टाकला आहे.

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट? Supreme Court On Ind VS Pak Match

उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. याचिकेमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि लोकांच्या भावनांच्या विरुद्ध आहे, असा दावा करण्यात आला होता. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी सुनावणीची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. काय गरज आहे? हा सामना आहे, तो होऊ द्या असे उत्तर न्या. जे. माहेश्वरी यांनी दिले. कोर्टाने सामन्याच्या आधी सुनावणी घेण्यास नकार दिल्याने (Supreme Court On Ind VS Pak Match) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

याचिकेत काय म्हंटल होते?

घटनेच्या कलम ३२ अंतर्गत दाखल केलेल्या या जनहित याचिकेत उर्वशी जैनसह चार कायद्याच्या विद्यार्थिनींनी आशिया कप टी-२० लीगचा भाग म्हणून १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याचे निर्देश तात्काळ देण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, २०२५ च्या अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याचीही मागणी केली आहे. याचिकेत म्हटले आहे की पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय नागरिक आणि सैनिकांनी आपले प्राण गमावले. अशावेळी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या राष्ट्रासोबत खेळांमध्ये सहभागी होणे म्हणजे आपल्या सैन्याचे मनोबल कमी करण्यासारखं आहे. यामध्ये आपल्या शहिद जवानांना आणि ज्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली त्या कुटुंबाना नक्कीच त्रास होण्याची शक्यता आहे. राष्ट्रहित, सैन्याचे बलिदान आणि देशातील लोकांच्या भावना यांच्यापेक्षा क्रिकेटला जास्त महत्व देता येणार नाही असेही सदर याचिकेत म्हंटल होते.