हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची धामधूम चालू आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. जसे गणेशोत्सव हा मोदक, डेकोरेशन, आरती, फुलं या सगळ्या गोष्टी शिवाय अपूर्ण आहे. तसेच गणेशोत्सव हा ढोल ताशाच्या पथकाशिवाय देखील अपूर्ण आहे. ढोल ताशा वाजला की, गणपती आलेले आहेत. असे आपसूकच सगळ्यांना समजते. दरवर्षी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. मिरवणुकीमध्ये ढोल ताशे असतात. परंतु आता यावर्षी ढोल ताशाच्या पथकावर कोणतीही बंदी असणार नाही. तसेच त्यावरील निर्बंध देखील शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यावर्षी कदाचित विसर्जन मिरवणुकीचा वेळ वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पुण्यातील गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन्याच्या मिरवणुका खूप प्रसिद्ध आहेत. संपूर्ण पुण्यात या दिवशी गर्दी पाहायला मिळते. रस्त्यावर ढोल ताशे वादन पाहायला मिळते. तसेच वेगवेगळ्या आपल्याला उपक्रम देखील पाहायला मिळतात. परंतु राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे ढोल ताशा पथकाच्या उत्साहाला देखील मर्यादा आल्या होत्या. परंतु आता या मर्यादा आणि निर्बंध काढल्यामुळे ढोल ताशा पथकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे.
याआधी ताशा ढोल आणि झांज पथकामध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते. आणि या विरोधात सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती. परंतु आता एनजीटीच्या या निर्बंधावर स्थगिती दिलेली आहे. तसेच ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण राखण्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.
एनजीटीचे आदेश काय होते?
एनजीटीने 30 ऑगस्ट रोजी ढोल कशापदकाबाबत काही आदेश दिले होते. या आदेशात त्यांनी ढोल ताशा पथकाबाबत निर्बंध घातलेले होते. त्यांनी म्हटले होते की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जन मिरवणुकी दरम्यान रियल टाईम ध्वनी प्रदूषण मोजावे. तसेच ढोल ताशा आणि झांज पथकामध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य असू नये.
एनजीटीने काही विचार करून हे निर्बंध लावले होते. परंतु पुणे हे गणेशोत्सवाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे इथे निर्बंध लावणे योग्य नाही. आणि हा त्यांचा एकतर्फी निर्णय झाला होता. त्यामुळे आता या सगळ्या निर्णयांना सगळी माहिती दिलेली आहे. आणि ढोल ताशा पथकावर कोणतीही संख्या मर्यादित राहणार नाही. ढोल ताशा हे आपल्या महाराष्ट्राच्या एक पारंपारिक वाद्य आहे. आणि तो आपल्या संस्कृतीचा खूप मोठा भाग आहे. त्यामुळे अनेक लोकांना गणेश मिरवणुकीमध्ये ढोल ताशा या पथकामध्ये भाग घ्यायला तसेच ती मिरवणूक पाहायला खूप आवडते.