Monday, February 6, 2023

पालघर हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात; राज्याला दिले ‘हे’ आदेश

- Advertisement -

नवी दिल्ली । महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गेल्या महिन्यात १६ एप्रिल रोजी दोन साधूंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमाकडून मारहाण व हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहचलं आहे. एका याचिकेद्वारे या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात न होता दिल्लीत व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेत राज्य सरकारकला या प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

काय झालं सुप्रीम कोर्टात
सुप्रीम कोर्टात एका याचिकेच्या माध्यमातून पालघर प्रकरणाची चौकशी कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी किंवा सीबीआयने केल्या गेली. सोबतच या घटनेची सुनावणी महाराष्ट्रातून हलवून दिल्लीत करण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. या सुनावणीत राज्यात सुरु असेलली चौकशी थांबवण्याची मागणी धुडकावून लावण्यात आली. तसंच कोर्टानं संबंधित याचिकेची प्रत याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावी असं म्हटलं. तसंच राज्यानं सुप्रीम कोर्टाकडे ४ आठवड्यांत प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश कोर्टानं दिले आहेत.

- Advertisement -

पालघरमध्ये अफवांच्या पार्श्वभूमीवर जमावाच्या मारहाणीत दोन साधूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीनं या घटनेवर भाष्य करत या घटनेला धार्मिक रंग देऊन त्याचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”