व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवज्योत सिंह सिद्धू यांना एक वर्षांची कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक माजी क्रिकेटपटू, राजकीय नेते असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. त्यांना कोर्टाने एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 34 वर्ष जुन्या अशा प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याचा निर्णय नुकताच कोर्टाने दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कोर्टात नवज्योत सिंह सिद्धू यांच्या 34 वर्ष जुन्या अशा प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी आज पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सिद्धू यांना शिक्षा सुनावली. सिद्धू यांच्या विरोधात गुरनाम सिंह यांच्या कुटुंबीयानी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यामध्ये आयपीसी कलम 304 नुसार शिक्षा झाली पाहिजे, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती. ती याचिका न्यायालयाने स्विकारली आणि याप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

नेमकं प्रकरण काय?

1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका वृद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पीडित पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.