सांगली | कवलापूर (ता. मिरज) येथील सुप्रिया केदार माळकर (वय- 19) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती केदार अशोक माळकर (वय- 24) याला अटक करण्यात आली आहे. सुप्रिया हिचे माहेर पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक हे आहे. माहेरील लोकांच्या फिर्यादीवरून पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूर म्हणून पतीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिवशी- -बुद्रुक (ता. पाटण, जि. सातारा) माहेर असलेल्या सुप्रिया गतवर्षी केदार माळकर याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस तिला व्यवस्थित नांदविले. मात्र दि. 24 डिसेंबरपासून केदारने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तिला शिवीगाळ करणे, अपमानस्पद वागणून देणे असा प्रकार सुरू होता. सुप्रियाने माहेरच्या लोकांना फोन करून याची माहती दिली होती. माहेरकडील लोकांनी केदारला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्याच्या वर्तणुकीत काहीच सुधारणा झाली नाही. उलट त्याने सुप्रियाचा अधिकच छळ सुरू केला. तिला मारहाण करीत असे.
या छळाला कंटाळून चार दिवसापूर्वी सुप्रियाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. माहेरकडील लोकांना हा प्रकार समजतला. दिवशी बुद्रुक येथील माहेरील लोक कवलापुरात आले. तेव्हा काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुप्रियाचा मृतदेह घेऊन ते दिवशी-बुद्रूकला घेऊन गेले. पती केदारने छळ केल्याने सुप्रियाने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरकडील लोकांनी केला आहे.